विराट शैली बदलणार! पहिल्याच कसोटीत कांगारूंना लोळवण्यासाठी द्रविडचा मास्टर प्लॅन | IND vs AUS 1st Test Rahul Dravid Master Plan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS 1st Test Rahul Dravid Master Plan

IND vs AUS 1st Test : विराट शैली बदलणार! पहिल्याच कसोटीत कांगारूंना लोळवण्यासाठी द्रविडचा मास्टर प्लॅन

IND vs AUS 1st Test Rahul Dravid Master Plan : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूर येथे 9 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी भारतीय संघ कसून सराव करत असून पहिल्याच सामन्यात कांगारूंना फिरकीच्या जाळ्यात फसवण्याचा टीम इंडियाचा प्लॅन दिसतोय. नागपूरची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, फिरकी खेळपट्टी ही दुधारी तलवारीसारखी आहे. कांगारूंना अडकवण्यासाठी फेकलेल्या जाळ्यात टीम इंडिया देखील अडकू शकते. याचमुळे भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी एक खास रणनिती आखल्याची खबर मिळाली आहे. राहुल द्रविड यांनी टीम इंडियाची दोन खास शस्त्र रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून स्वीप शॉटचा खास सराव करून घेतला.

विशेष म्हणजे रोहित शर्मा हा फिरकीविरूद्ध सर्रास स्वीप शॉटचा वापर करतो. मात्र विराट कोहली सहसा सरळ बॅटनेच फटकेबाजी करणे पसंत करतो. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत विराट कोहलीला आपल्या बॅटिंगच्या शैलीत थोडा बदल करावा लागणार आहे.

असा आहे राहुल द्रविडचा मास्टर प्लॅन

- राहुल द्रविडचा रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुलला कांगारूंचा फिरकी मारा थोपवण्यासाठी स्वीप शॉटचा वापर करण्याचा सल्ला

- गेल्या मालिकेत ऋषभ पंतने देखील हीच रणनिती वापरली होती. द्रविड पंतची ही रणनिती इतर फलंदाजांनी देखील वापरावी अशी इच्छा आहे.

- नॅथन लियॉनने भारताविरूद्ध 22 कसोटी सामन्यात 34 च्या सरासरीने 94 विकेट्स घेतल्या आहेत.

- त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 21 विकेट्सपैकी 7 विकेट्स या भारताविरूद्धच घेतल्या आहेत.

भारताविरूद्ध सेना देश अर्थात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे स्वीप शॉट्सचा सढळ हाताने वापर करत असतात. भारतीय फिरकीचा मुकाबला करण्यासाठीचे हे त्यांचे अस्त्र आहे. भारत देखील काऊंटर अटॅकसाठी याच अस्त्राचा वापर करण्याची शक्यता आहे. भारतीय संघ यासाठी सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यावर देखील जबाबदारी टाकू शकतो.

नागपूर कसोटीत श्रेयस अय्यर खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्या जागेवर सूर्यकुमार यादवला संधी देण्याची शक्यता आहे. तर ऋषभ पंतच्या अनुपस्थिती इशान किशन आणि केएस भरत यांच्यात संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस असेल.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली