'मुंबईकरांना आमचे यश पचत नाही' मुरली विजयची BCCI नंतर मांजरेकरांवर टीका!

मुरली विजयची संजय मांजरेकरांवर टीका
Murali Vijay Lashes Out Sanjay Majrekar
Murali Vijay Lashes Out Sanjay Majrekar sakal

Murali Vijay Lashes Out Sanjay Majrekar : भारताचा माजी फलंदाज मुरली विजय याने माजी क्रिकेटवीर संजय मांजरेकर यांच्यावर टीका केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नागपूरमध्ये चालू असणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दूरचित्रवाणीवर देशामध्ये खेळताना कोणत्या भारतीय खेळाडूचा पन्नास धावांचे शतकांमध्ये रूपांतर करायचा (कन्व्हर्जन रेट) वेग जास्त आहे याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. या आकडेवारीमध्ये मुरली विजय याचे नाव असल्याने, सामन्याचे समालोचन करणारे मुंबईचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मुरली विजयनेही निवृत्तीपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) संताप व्यक्त केला होता. मुरली विजयने आरोप केला होता की, भारतात 30 वर्षांवरील खेळाडूंना 80 वर्षांचे मानले जात आहे. बीसीसीआयसोबतचा आपला वेळ संपला असल्याचेही तो म्हणाला.

Murali Vijay Lashes Out Sanjay Majrekar
T20 WC23 : पाकविरुद्धच्या लढतीला स्मृती मुकणार! कर्णधार हरमनप्रीतवरही प्रश्‍नचिन्ह

या सर्वोत्तम कन्व्हर्जन रेट असणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत मुरली विजयचे नाव सर्वात वर आहे. त्याचा कन्व्हर्जन रेट ३० सामन्यांमध्ये ६० टक्के इतका आहे. त्याच्या खाली मोहम्मद अझरुद्दीन, पॉली उम्रीगर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावे असल्याने मांजरेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

त्यावर प्रतिउत्तर देताना मुरली विजय याने ‘संजय मांजरेकर यांनी माझे नाव सर्वोत्तम कन्व्हर्जन रेटच्या यादीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे, याचाच अर्थ मुंबईच्या खेळाडूंना देशातीलच दक्षिणेच्या राज्यांमधून येणाऱ्या खेळाडूंचे यश पचत नाही’ अशी टीका मांजरेकरांवर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com