
IND vs AUS: 'संपूर्ण सामन्यात दडपणाखाली होतो, पण...' हार्दिक पांड्याने सांगितली विजयाची 2 कारणे
Ind vs Aus ODI Hardik Pandya : मुंबई एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला. भारताने 189 धावांचे लक्ष्य केवळ 39.5 षटकांत पूर्ण केले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेटने विजय मिळविल्यानंतर हार्दिक पंड्याने केएल राहुल आणि रवींद्र जडेजाचे कौतुक केले.
राहुलने नाबाद 75 आणि जडेजाने नाबाद 45 धावा केल्या, खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावे लागले.
कर्णधार पांड्या म्हणाला की, “मी आमच्या कामगिरीने खूप खूश आहे. जड्डू (जडेजा) आठ महिन्यांनंतर परतला आणि त्याने चमकदार कामगिरी केली. मी माझ्या गोलंदाजी आणि फलंदाजीचा आनंद लुटला. पण जड्डू आणि राहुलची फलंदाजी आश्वासक होती. आम्ही दोन्ही डावात दडपणाखाली होतो, पण आम्ही आमचा संयम गमावला नाही आणि कठीण परिस्थितीतून बाहेर आलो.
सामनावीर जडेजा म्हणाला की, गुडघ्याच्या ऑपरेशननंतर आठ महिन्यांनी पुनरागमन करताना तो या फॉर्मेटशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि ही कामगिरी बोनस म्हणून मिळाली.
जडेजा पुढे म्हणाला की, आम्हाला अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. भारताने चांगली गोलंदाजी केली. जर आम्ही 250 धावा केल्या असत्या तर आम्ही सामन्यात टिकू शकलो असतो. वेगवान गोलंदाजांना यष्टीमागे खूप मदत मिळाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 189 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने हे लक्ष्य 5 गडी गमावून पूर्ण केले. भारताच्या विजयाचे हिरो होते केएल राहुल आणि रवींद्र जडेजा. केएल राहुलने 75 आणि जडेजाने 45 धावा केल्या. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी नाबाद 108 धावांची भागीदारी झाली. तत्पूर्वी, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी 3-3 बळी घेतले.