
IND Vs AUS : वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाने बदलला कर्णधार! अश्विनची संघात एंट्री, जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?
IND Vs AUS ODI Series Team India Squad : आशिया कप जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान भारतीय भूमीवर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वर्ल्डकपपूर्वी दोन्ही देशांची ही शेवटची वनडे मालिका असणार आहे. पाच ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे.
बीसीसीआयने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली. पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल टीम इंडियाचे कर्णधार असेल तर तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करेल.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीसह इतर वरिष्ठ खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. तर जडेजाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
पहिल्या 2 वनडेसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर
तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
दुसरीकडे या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच जाहीर झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघात वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांची निवड करण्यात आली आहे. कमिन्स, स्मिथ, स्टार्क आणि मॅक्सवेल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकले नाहीत. दुखापतग्रस्त ट्रॅव्हिस हेडचा 18 जणांच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. ट्रॅव्हिस हेडच्या जागी आलेल्या मार्नस लॅबुशेनला संघात ठेवण्यात आले आहे.
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे वेळापत्रक:
पहिली वनडे – 22 सप्टेंबर – मोहाली
दुसरी वनडे – 24 सप्टेंबर – इंदूर
तिसरी वनडे – 27 सप्टेंबर – राजकोट