
IND vs AUS ODI: ऑस्ट्रेलिया वनडे मालिका संपण्याआधीच टीम इंडियाच्या 'या' दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली!
India vs Australia ODI Series : भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिस-या आणि अंतिम सामना चेन्नईत खेळणार आहे. तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.
भारतीय संघाची नजर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सहाव्या वनडे मालिकेवर असेल. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कने पहिल्या दोन सामन्यात आठ विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईतील पहिल्या सामन्यात स्टार्कने तीन तर विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले.
संपूर्ण संघ 26 षटकेच फलंदाजी करू शकला आणि 117 धावा करून सर्वबाद झाला. या सामन्यात टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरला. मालिकेतील पहिल्या सामन्यातही हा खेळाडू संघावर ओझे ठरला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला सतत खेळण्याची संधी मिळत आहे. पण या संधी तो सतत वाया घालवत आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात केवळ एक चेंडू खेळून सूर्यकुमार यादव पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघाला त्याच्याकडून खूप आशा होत्या, पण या सामन्यातही त्याने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावली. सूर्यकुमार यादवची ही खराब कामगिरी त्याला येत्या सामन्यांमध्ये प्लेइंग 11 मधूनही बाहेर काढू शकते.
सूर्यकुमार यादवच्या बॅटने 2022 मध्ये फेब्रुवारीमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 64 धावांची खेळी पाहायला मिळाली होती. त्यानंतर त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी पाहायला मिळाली नाही.
फेब्रुवारी 2022 पासून या फलंदाजाने 13 सामने खेळले आहेत परंतु एकाही सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या बॅटमधून फक्त 2 वेळा 30 पेक्षा जास्त धावा आल्या आहेत तर तो 10 पेक्षा कमी धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. या मालिकेत त्याला अजून खातेही उघडता आलेले नाही.