IND vs AUS: बीसीसीआयची मोठी कारवाई! केएल राहुलची उपकर्णधार पदावरून हकालपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus series BCCI Big action KL Rahul sacked as vice-captain cricket news in marathi

IND vs AUS: बीसीसीआयची मोठी कारवाई! केएल राहुलची उपकर्णधार पदावरून हकालपट्टी

Ind vs Aus Test-ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचे पुनरागमन झाले आहे. दिल्लीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी सोडण्यात आले.

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागच्या वेळी संघाची यादी जाहीर करताना बीसीसीआयने केएल राहुलचे नाव उपकर्णधार म्हणून ठेवले होते, तर यावेळच्या संघाच्या यादीत कोणत्याही खेळाडूविरुद्ध उपकर्णधार लिहिलेले नाही. याचा अर्थ असा होतो की केएल राहुलची उपकर्णधार पदावरून हकालपट्टी झाली आहे.

केएल राहुलने गेल्या काही सामन्यांमध्ये बरीच निराशाजनक कामगिरी केली आहे. या कसोटी मालिकेतही तो आतापर्यंत कोणतीही खास कामगिरी झालेली नाही. नागपूर कसोटी सामन्यात तो 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी दिल्ली कसोटी सामन्यात त्याच्या बॅटने पहिल्या डावात 17 तर दुसऱ्या डावात 1 धावा करून आऊट झाला. राहुलची ही कामगिरी पाहिल्यानंतर शुभमन गिलला संघात न घेतल्याने संघ व्यवस्थापनावर सातत्याने टीका होत आहे.

केएल राहुलकडून उपकर्णधारपद काढून घेतल्याचा अर्थ आता पुढील सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. शुभमन गिल फॉर्ममध्ये आहे, त्याला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते.

भारतीय संघाचा 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये 1 ते 5 मार्च तर चौथा आणि शेवटचा सामना 9 ते 14 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळल्या जाणार आहे. या मालिकेत भारताकडे सध्या 2-0 अशी अजेय आघाडी आहे. तिसरा सामना जिंकल्याने टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीट निश्चित करेल.