IND vs AUS: टीम इंडियाचे टेंशन वाढले! कांगारूंचा अष्टपैलू खेळाडू तिसऱ्या कसोटी खेळणार?

India vs Australia 3rd Test
India vs Australia 3rd Testsakal

India vs Australia 3rd Test : भारतीय संघाने आतापर्यंत मायदेशात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये 1 मार्चपासून खेळल्या जाणार आहे.

मात्र या तिसर्‍या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे टेन्शन थोडे वाढले आहे. कांगारू संघाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन तंदुरुस्त झाला आहे. आता तो तिसऱ्या कसोटीत खेळेल अशी अपेक्षा आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात कॅमेरून संघाला ताकद पुरवतो.

India vs Australia 3rd Test
IND vs AUS: दिल्ली कसोटीनंतर 'या' दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली? निवडकर्त्याने दिली मोठी अपडेट

कॅमेरॉन ग्रीनचे बोट फ्रॅक्चर होते या कारणामुळे तो मालिकेतील पहिले दोन सामने खेळला नाही. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी कॅमेरूनने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपला संघ मजबूत करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना कॅमेरून ग्रीन म्हणाला, 'जेव्हा तुम्ही अष्टपैलू खेळाडू म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवाल तेव्हा तुम्हाला संघाला थोडीशी मदत होईल. आता या तिसर्‍या कसोटी सामन्यात संघ व्यवस्थापन कोणत्या संघाला मैदानात उतरवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

India vs Australia 3rd Test
WT20 WC: यजमान दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! रोमहर्षक उपांत्य फेरीत इंग्लंडला चारली धूळ

कॅमेरून ग्रीनने आतापर्यंत 18 कसोटी सामने खेळले आहेत, त्यात 35 च्या सरासरीने 806 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 अर्धशतके झळकली. कॅमेरून ग्रीनची सर्वोत्तम धावसंख्या 84 धावांची आहे. गोलंदाजीत त्याने कसोटीत 2.85 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना 23 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 27 धावांत 5 विकेट घेणे ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com