IND vs AUS Test: न्यूझीलंडला हरवल्यानंतर बुमराहबाबत कर्णधार रोहितचा मोठा खुलासा; म्हणाला...

ind vs aus test Rohit Sharma makes huge statement on Jasprit Bumrah
ind vs aus test Rohit Sharma makes huge statement on Jasprit Bumrah

Ind vs Aus Test Series 2023 : धावांच्या महापुरात पुन्हा एकदा भारतीय संघाची सरशी झाली. तब्बल 385 धावाही कमी पडतात काय, असे वाटत असताना शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव मदतीला धावून आले आणि भारताने 90 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. तीन वर्षांनंतर रोहित शर्माचे शतक झळकले, तर शुभमन गिलने पुन्हा एकदा शतकी नजराणा सादर केला.

न्यूझीलंडविरुद्ध 13 वर्षांतील पहिल्या क्लीन स्वीपनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मीडियाशी संवाद साधत आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत अनेक विधाने केली. यादरम्यान त्याने टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबतही मोठा खुलासा केला आहे.

ind vs aus test Rohit Sharma makes huge statement on Jasprit Bumrah
IND vs NZ: टी-20 मालिकेआधी कॅप्टन पांड्याला मोठा धक्का! हा दिग्गज खेळाडू बाहेर

दुखापतीमुळे बुमराह बराच काळ संघातुन बाहेर आहे. न्यूझीलंड मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती पण मालिका सुरू होण्यापूर्वी तो बाहेर पडला. यापूर्वी, बुमराहने विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले होते, परंतु तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आणि विश्वचषकातूनही तो बाहेर पडला.

अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाला त्याच्यासोबत कोणतीही घाई करायची नाही. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बुमराहची संघात निवड झाली नाही. पण कर्णधार रोहित शर्माने त्याच्या पुनरागमनाशी संबंधित असे विधान केले आहे की चाहते खूश होतील.

ind vs aus test Rohit Sharma makes huge statement on Jasprit Bumrah
IND vs NZ 3rd ODI : कॉन्वेचा कडवी झुंज मोडून काढत भारताचा किवींना व्हाईट वॉश; रँकिंगमध्ये पटकावले अव्वल स्थान

कर्णधार रोहित शर्माला आशा आहे की जसप्रीत बुमराह पुढील महिन्यात सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराहने गेल्या वर्षी सप्टेंबरपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही, परंतु त्याने नुकतेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे नेटमध्ये गोलंदाजी केली, त्यामुळे लवकर पुनरागमनाची आशा पूर्ण झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com