IND vs NZ: टी-20 मालिकेआधी कॅप्टन पांड्याला मोठा धक्का! हा दिग्गज खेळाडू बाहेर

टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली
India vs New Zealand T20 2023
India vs New Zealand T20 2023

India vs New Zealand T20 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना 90 धावांनी जिंकला आणि मालिकाही 3-0 अशा फरकाने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने न्यूझीलंडसमोर 386 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात किवी संघ केवळ 295 धावा करू शकला आणि सामना गमावला.

एकदिवसीय मालिकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकाही खेळायची असून या मालिकेत हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, मात्र भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड मनगटाच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या संपूर्ण T20I मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

India vs New Zealand T20 2023
Ranji Trophy: धोनीचा पठ्ठ्या परतलाय; वर्षानंतर केदार जाधवचे धडाकेबाज पुनरागमन

गायकवाड हा भारताच्या टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग असून तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, गायकवाड यांना मनगटात दुखत असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेले आहेत. हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात त्याने 8 आणि 0 धावा केल्या. फलंदाजी करताना त्याच्या उजव्या मनगटात दुखत असल्याची माहिती महाराष्ट्राच्या फलंदाजाने बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला दिली. तो एनसीएमध्ये तपासणी आणि उपचारांसाठी गेला आहे.

India vs New Zealand T20 2023
WFI Controversy: 'आमच्याशी चर्चा न करता क्रीडा खात्याने समिती नेमली'

न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. गायकवाड वेळेत तंदुरुस्त झाला नाही, तर या मालिकेसाठी निवड झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध पृथ्वी शॉ सलामी करू शकतो. शॉने शेवटचा मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारतासाठी खेळला होता. भारतीय मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आधीच एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी मालिकेतील पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी अय्यरची संघात निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात ही मालिका रंगणार आहे.

India vs New Zealand T20 2023
IND vs NZ 3rd ODI : कॉन्वेचा कडवी झुंज मोडून काढत भारताचा किवींना व्हाईट वॉश; रँकिंगमध्ये पटकावले अव्वल स्थान

गायकवाडला हैदराबादविरुद्ध खेळता आले नसले तरी तो सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये धावत आहे. तमिळनाडूविरुद्ध त्याने 195 धावांची मोठी खेळी खेळली. त्याआधी त्याने आंध्र प्रदेश आणि सौराष्ट्रविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. गायकवाडने गेल्या 10 सामन्यांमध्ये 5 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने एकदा नाबाद द्विशतक झळकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com