IND vs AUS: कर्णधार कमिन्सवर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची टीका, म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test series Mark Taylor and Jeff Lawson criticise-pat cummins after-australia-defeats cricket news in marathi

IND vs AUS: कर्णधार कमिन्सवर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची टीका, म्हणाले...

Ind vs Aus Test Series : ऑस्ट्रेलियाचा संघ कोणत्याही दौऱ्यावर असला तरी त्यांचे माजी खेळाडू प्रतिस्पर्ध्यांवर चौफेर टीका करण्याचा माइंड गेम खेळत असतात; पण या वेळी मात्र हे माजी खेळाडू आपल्या संघाला खडे बोल सुनावत आहेत. चॅपेल बंधू, मार्क टेलर यांच्यानंतर आता माजी वेगवान गोलंदाज जेफ लॉसन यांनी कर्णधार पॅट कमिन्सला टार्गेट केले आहे.

सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानानवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले आहेत त्याचे पडसाद ऑस्ट्रेलियात उमटणे स्वाभाविक आहे. कर्णधारपदाच्या अनुभवात कमिन्स कमी पडत आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अशी अवस्था झाली आहे, अशी थेट टीका लॉसन यांनी केली आहे.

फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कसे नेतृत्व करावे यात कमिन्स अनुभवात कमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेफिल्ड शील्ड या राष्ट्रीय स्पर्धेत तो फार कमी खेळलेला आहे. तसेच त्याच्याकडे फिरकी खेळपट्यांवर खेळण्याचा अनुभव नाही, असे लॉसन यांनी म्हटले आहे.

डावपेचांचाही अभाव

अक्षर पटेल, अश्विन आणि जडेजा यांच्या भागीदारी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियन रणनीती तयार करताना किंवा त्यांची अंमलबजावणी करताना दिसून येत नाहीत, असे लॉसन यांनी सांगितले.