Australia Announced ODI Squad Against India
Australia Announced ODI Squad Against India

IND vs AUS: भारताविरुद्धच्या ODI मालिकेसाठी कांगारू संघाची घोषणा! 'या' धाक्कड खेळाडूंची एंन्ट्री

ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा! जाणुन घ्या कोणाला मिळाली संधी

Australia Announced ODI Squad Against India : भारताविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि झाय रिचर्डसन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या संघात डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन आणि पॅट कमिन्स यांच्या नावांचाही समावेश आहे.

Australia Announced ODI Squad Against India
Ben Stokes IPL 2023 : चेन्नईला अजून एका विदेशीने दिला दगा; जेमिसननंतर आता स्टोक्स...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी इंदूर (1-5 मार्च) आणि चौथी कसोटी अहमदाबाद (9-13 मार्च) येथे खेळवल्या जाणार आहे. त्यानंतर 17 मार्चपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे पहिला एकदिवसीय सामना खेळू शकणार नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या नेतृत्व करेल अशी माहिती बीसीसीआयने दिली.

Australia Announced ODI Squad Against India
Sarah Taylor : इंग्लंडच्या सारा टेलरची मोठी घोषणा; गर्भवती पार्टनर डायनासोबत फोटो केला शेअर

मिचेल मार्श आणि मॅक्सवेल दोघेही शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटच्या खेळातून बाहेर होते. पण आता मुंबई, विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे होणाऱ्या सामन्यांसाठी संघात सामील होणार आहे. मॅक्सवेल या आठवड्यात शेफिल्ड शिल्डमध्ये व्हिक्टोरियाकडून खेळत आहे आणि मार्श या आठवड्याच्या अखेरीस मार्श वन-डे कपमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळेल अशी अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाज जे रुडसनही दुखापतीतून सावरल्यानंतर परतला आहे.

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023

  • तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च (इंदौर)

  • चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)

  • पहिली वनडे - 17 मार्च (मुंबई)

  • दुसरी एकदिवसीय - मार्च 19 (विशाखापट्टणम)

  • तिसरी एकदिवसीय - 22 मार्च (चेन्नई)

एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स, शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com