IND vs AUS: रोहितने नागपुरच्या खेळपट्टीवर शतक करणे म्हणजे...! कोच काय बोलून गेले

तिन्ही प्रकारांत शतक करणारा भारताचा कर्णधार ठरलेल्या रोहित शर्माने नागपूर कसोटी सामन्यात केलेले शतक खास कारण...
Ind vs Aus Test Rohit Sharma
Ind vs Aus Test Rohit Sharma

Ind vs Aus Test Rohit Sharma : तिन्ही प्रकारांत शतक करणारा भारताचा कर्णधार ठरलेल्या रोहित शर्माने नागपूर कसोटी सामन्यात केलेले शतक खास होते. खेळपट्टी फलंदाजी करायला सोपी नव्हती. आपले प्रमुख फलंदाज बाद होत असताना रोहितने खेळावर नियंत्रण राखत रचलेले शतक केवळ अप्रतिम होते. आपल्या संघातील तीन फिरकी गोलंदाज चांगली फलंदाजी संघाला गरज असताना करू शकतात, ही मोठी जमेची बाजू आहे. १४४ धावांची आघाडी खूप मोठी नसली तरी समोरच्या संघावर दडपण आणायला चांगली आहे. अजून जडेजा-अक्षर खेळत आहेत म्हणून भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे हे खात्रीने म्हणू शकतो, असे मत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केले.

Ind vs Aus Test Rohit Sharma
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान गैरप्रकार! चौघांना अटक, काय आहे प्रकरण

भारतीयांना गोलंदाजी आव्हानात्मक : मर्फी

ऑस्ट्रेलियन ‘अ’ संघाच्या श्रीलंका दौऱ्यावर गेल्यामुळे मला भारतीय उपखंडात खेळताना काय करावे लागेल याचा थोडा अंदाज आला होता, पण भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करणे आव्हानात्मक आहे. कारण त्यांचे फिरकीला खेळायचे तंत्र चांगले आहे, सगळे फलंदाज पॅडच्या पुढे बॅट आणून खेळताना आढळतात. त्याचबरोबर भारतीय फलंदाजांकडे धावा जमा करायला जास्त फटके आहेत, असे मर्फी म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com