IND vs AUS: रोहितचे वाढले टेन्शन! अजूनही भारत WTC फायनलमधून पडू शकतो बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs aus test wtc final-2023-team-india-out-according-to-icc-there-can-be-clash-between-australia-vs-sri-lanka

IND vs AUS: रोहितचे वाढले टेन्शन! अजूनही भारत WTC फायनलमधून पडू शकतो बाहेर

Ind vs Aus Test : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकेत भारताची उत्कृष्ट कामगिरी चालू आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाकडून 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. भारतीय संघाने मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. भारताने सुरुवातीच्या दोन्ही कसोटी जिंकून 2-0 अशी आघाडीही घेतली आहे.

ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. अशा स्थितीत प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. दरम्यान आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघाबाबत आपले अंदाज जाहीर केले आहेत. यानुसार भारतीय संघाला अजूनही बाहेर जाण्याचा धोका आहे.

ICCच्या म्हणण्यानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 88.9 टक्के फायनल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील विजेतेपदाच्या सामन्याची शक्यता 8.3 टक्के आहे. त्याचप्रमाणे भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा आकडा 2.8 टक्के आहे. टीम इंडियाने दिल्ली कसोटी जिंकल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता फक्त 3 संघ राहिले आहेत.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाचा संघ 66.67 टक्के गुणांसह पहिल्या तर भारतीय संघ 64.06 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 1 मार्चपासून इंदूरमध्ये सुरू होणारी कसोटी भारतीय संघाने जिंकल्यास तो अव्वल स्थानी पोहोचेल आणि अंतिम फेरीतही स्थान निश्चित करेल. श्रीलंकेचा संघ सध्या 53.33 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताविरुद्धच्या पुढील 2 कसोटी सामने ड्रॉ केले किंवा जिंकले तर श्रीलंकेला अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्यास भारतीय संघाची कमाल स्कोअर 60.64 टक्के होईल. दुसरीकडे जर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम मालिकेत दोन्ही कसोटी सामने जिंकले तर त्याला 61.11 टक्के गुण मिळतील. आयसीसीचा हा अंदाज आहे, जो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून भारत बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त करतो. मात्र भारताची सध्याची कामगिरी पाहता आयसीसीचा ऑस्ट्रेलिया-श्रीलंका फायनलचा अंदाज खरा ठरणार नाही, अशी अपेक्षा भारतीय चाहते करू शकतात.