Virat Kohli Video : कोहलीचं १२०५ दिवसांनंतर दमदार शतक! सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल; 'या' खास व्यक्तीला दिलं श्रेय
अखेर विराट कोहलीने 1205 दिवसांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. त्याने 23 नोव्हेंबर 2019 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात कोहलीने आश्चर्यकारक कामगिरी केली.
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सामन्याच्या चौथ्या दिवशी (12 मार्च) विराटने कसोटीतील 28वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75वे शतक झळकावले. यानंतर त्यांनी खास पद्धतीने सेलिब्रेशनही केले.
कोहलीने नेथन लायनच्या बॉलिंगवर फ्लिक करत एक रण घेतला आणि त्यानंतर त्यांने अतिशय आरामात सेलिब्रेशन केले. यापूर्वी विराट जेव्हा शतक झळकावायचा तेव्हा तो आनंदाने उड्या मारायचा. हवेत पंच मारायचा, पण आता तो तसे करत नाही. विराटने सर्वप्रथम हेल्मेट काढले. मग हातातून ग्लोव्हज काढले. त्यानंतर कोहलीने आपल्या गळ्यातील साखळीतील अंगठी काढून प्रेक्षकांना दाखवली आणि तिचे चुंबन घेतले.
कोहलीसाठी रिंक का खास आहे?
खरंतर कोहलीने लग्नाची अंगठी गळ्यातील साखळीत लॉकेटसारखी ठेवली आहे. जबरदस्त इनिंग खेळल्यानंतर तो त्या रिंगला किस करतो. असे केल्याने कोहलीने पत्नी अनुष्का शर्माची आठवण काढली आणि ती खेळी तिला समर्पित केली.
विराटने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून असंच सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळी केल्यानंतर देखील विराटने अंगठीचे चुंबन घेतले होते. कोहलीने 2017 मध्ये अनुष्कासोबत लग्न केले. लग्नानंतर त्याच्यात अनेक चांगले बदल झाल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. याचे श्रेय तो अनुष्काला देतो.
विराटचे दुसरे सर्वात संथ शतक
दरम्यान हे विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात संथ शतक आहे. या शतकासाठी त्याने 241 चेंडूंचा सामना केला. कोहलीचे सर्वात संथ शतक 2012 मध्ये नागपूरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध झाले होते. त्या सामन्यात त्याने आपल्या शतकासाठी 289 चेंडूंचा सामना केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.