WTC 2023 Final : रोहित शर्मासमोर मोठं संकट! प्लेइंग इलेव्हनमधून कोणाचा पत्ता करणार कट

Ind vs Aus WTC Final 2023
Ind vs Aus WTC Final 2023sakal

WTC 2023 Final : टीम इंडियाच्या नव्या मिशनला सुरुवात झाली आहे. सात जूनपासून जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या जाणार आहे. केएल राहुलच्या दुखापतीआधी टीम इंडियाची घोषणा बीसीसीआयने केली होती, मात्र त्यात बदल करण्यात आला आहे.

त्याच्या जागी ईशान किशनला मुख्य संघात संधी देण्यात आली आहे. बाकीची टीम तशीच आहे. आता भारतीय संघ ओव्हलवर सराव करत असून लवकरच इंट्रा स्क्वॉड मॅचही खेळली जाणार आहे. पण यावेळी टीम इंडियाचं टेन्शन फायनलच्या प्लेइंग इलेव्हनचं आहे.

Ind vs Aus WTC Final 2023
Ruturaj Gaikwad: भावा वहिनीनी जिंकले मन! ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीने मैदानात धोनीच्या पडल्या पाया अन्...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असेल, हा मोठा प्रश्न आहे. तसे रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार याची खात्री आहे. मात्र उर्वरित खेळाडूंबाबत सस्पेन्स आहे.

विशेषत: टीम इंडिया कोणत्या बॉलिंगच्या जोडीने मैदानात उतरणार, हा मुद्दा इथेच अडकला आहे. म्हणजे तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू असतील किंवा चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज मैदानात उतरतील. तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचे योग्य संयोजन असले तरी हा सामना इंग्लंडमधील ओव्हलवर असल्याने टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

एकच फिरकीपटू खेळला तर तीनपैकी दोन फिरकीपटूंना बाहेर बसावे लागेल. रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. आता कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन कोणासोबत जाणार हे सांगणे कठीण आहे.

Ind vs Aus WTC Final 2023
Ruturaj Gaikwad: भावा वहिनीनी जिंकले मन! ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीने मैदानात धोनीच्या पडल्या पाया अन्...

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाज खेळले तर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर खेळताना दिसू शकतात. जयदेव उनाडकटही संघात असला, तरी या चार खेळाडूंपैकी कोणताही खेळाडू दुखापत झाल्यास त्याला संधी मिळू शकते. मात्र तीनच वेगवान गोलंदाज खेळले तर शमी आणि सिराजची जागा निश्चित झाली असली तरी शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांच्यात हे गणित अडकणार आहे.

शार्दुल ठाकूर जर खेळला तर उमेश यादव प्लेइंग इलेव्हनचा भाग नसू शकतो. याचे कारण म्हणजे शार्दुल ठाकूर फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चांगला हात दाखवतो. याआधी 2021 टीम इंडिया या ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरली होती, तेव्हा ठाकूरने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली होती.

Ind vs Aus WTC Final 2023
WTC Final 2023 : 'परिस्थिती बघून संघ निवडा...' WTC फायनलपूर्वी माजी दिग्गजाने टीम इंडियाला दिला इशारा

आता फिरकीपटूंपैकी कोण खेळणार आणि कोण नाही हा प्रश्न आहे. टीम इंडियात एकच स्पिनर खेळवला तर रवींद्र जडेजा असु शकतो. तो अलीकडेच त्याच्या टीम सीएसकेला आयपीएल चॅम्पियन बनवण्यात मोठी भूमिका बजावताना दिसला.

अशा स्थितीत अक्षर पटेल आणि अश्विनला बाहेर बसावे लागू शकते. मात्र हे दोघेही केवळ चेंडूनेच नव्हे तर बॅटनेही सामने जिंकण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. पण इंग्लंडमधील परिस्थिती कदाचित तीन फिरकीपटूंसोबत जाण्याची परवानगी देणार नाही.

दुसरीकडे, दोन फिरकीपटू खेळण्याची संधी मिळाल्यास रवींद्र जडेजासह अक्षर पटेल प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतो. अनेक समीकरणे बनवली जात असली तरी अंतिम निर्णय काय होणार, हे 7 जून रोजी दुपारी 3 वाजता कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीसाठी मैदानावर गेल्यावर कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com