IND vs BAN: चार वर्षांची प्रतीक्षा लांबली! शतक हुकल्यानंतर चेतेश्वर पुजाराचा मोठा खुलासा...

पुजाराला 4 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची संधी होती मात्र...
IND vs BAN 1st Test Cheteshwar Pujara
IND vs BAN 1st Test Cheteshwar Pujara sakal

Cheteshwar Pujara India vs Bangladesh 1st Test: भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार खेळी केली. चितगाव कसोटीत भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राहुल आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात केली, मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजाराने शानदार खेळी केली.

चेतेश्वर पुजाराने या सामन्यात 90 धावा केल्या आणि अवघ्या 10 धावांनी त्याचे शतक हुकले. यानंतर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने फलंदाजांच्या जोरावर आपली स्थिती मजबूत केली आहे. टीम इंडियाने 6 गडी गमावून 278 धावा केल्या आहेत.

IND vs BAN 1st Test Cheteshwar Pujara
Kane Williamson: न्यूझीलंड क्रिकेट संघात भूकंप! पाकिस्तान दौऱ्यापूर्वी विल्यमसनने सोडले कर्णधारपद

पुजाराला 4 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याची संधी मिळाली होती, मात्र तो तसे करू शकला नाही. पुजाराला डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामने क्लीन बोल्ड केले. पुजाराने जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. त्यानंतर पुजाराने सिडनी कसोटीत 193 धावा केल्या. त्यानंतर पुजाराला आजपर्यंत शतक झळकावता आलेले नाही.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चेतेश्वर पुजारा म्हणाला, 'मी आजच्या खेळीने खूश आहे, शतक न झळकावल्याची चिंता नाही. मी चांगली फलंदाजी करत आहे आणि जर मी असाच खेळत राहिलो तर हे (शतक)ही लवकरच होईल. खुलासा करताणा तो म्हणाला की या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही, ज्यामुळे फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल.

IND vs BAN 1st Test Cheteshwar Pujara
Arjun Tendulkar: 'सचिनचा मुलगा आहेस हे...' युवराजच्या वडिलांनी अर्जुनला दिला होता गुरुमंत्र

पुढे बोलताना तो म्हणाला की, श्रेयस अय्यरसोबतची माझी भागीदारी महत्त्वाची होती, ऋषभ पंतसोबतही, कारण त्यावेळी आम्ही 3 विकेट गमावल्या होत्या. आम्ही दिवसभरात फक्त चार किंवा पाच विकेट गमावल्या असत्या तर बरे झाले असते. मला अजूनही वाटते की पहिल्या डावात 350 धावा ही या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या असेल कारण त्यात वळण आले आहे आणि आमच्याकडे तीन फिरकीपटू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com