Ind vs Ban 2nd Test Day 3 : भारताचे 4 फलंदाज तंबूत; बांगलादेशची कसोटीवर पकड

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
Ind vs Ban 2nd Test Day 3 Live
Ind vs Ban 2nd Test Day 3 Liveesakal

India vs Bangladesh 2nd Test Day 3 Live Cricket Score: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने बांगलादेशचा 231 धावात गुंडाळला. बांगलादेशकडून लिटन दास (73) आणि झाकीर हसनने (51) झुंजार फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान ठेवले. मात्र भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. बांगलादेशने तिसरा दिवस संपेपर्यंत 45 धावात भारताच्या 4 विकेट्स घेतल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी अजून 100 धावांची गरज आहे तर बांगलादेशला उद्या भारताच्या 6 विकेट्स घ्यायच्या आहेत.

भारताच्या तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 45 धावा 

37-4 : मेहदी हसनने भारताचे टेन्शन वाढवले

मेहदी हसन मिराजने आधी शुभमन गिलला 7 धावांवर तर दिवस संपायला अवघी काही षटके राहिली असताना विराट कोहलीला 1 धावेवर बाद करत भारताची अवस्था 4 बाद 37 धावा अशी केली.

 12-2 : राहुल पाठोपाठ पुजाराही परतला

मेहदी हसन मिराजने भारताला दुसरा धक्का दिला. त्याने चेतेश्वर पुजाराला 6 धावांवर यष्टीचीत केले.

भारताला पहिला धक्का, राहुलकडून पुन्हा निराशा

भारताचा कर्णधार केएल राहुल पुन्हा एकदा फेल गेला. शाकिब अल हसनने त्याला अवघ्या 2 धावेवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला.

भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान

लिटन दास बाद झाल्यानंतर टस्किन अहमदने 31 धावांची खेळी करत बांगलादेशला चांगली आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र अश्विनने तैजुल इस्लामला 1 धावेवर तर गिलने खालेद अहमदला 4 धावांवर धावबाद करत बांगलादेशचा डाव 231 धावांवर संपवला. भारताला आता कसोटी जिंकण्यासाठी 145 धावांची गरज आहे.

219-8 (66.1 Ov) : अखेर मोहम्मद सिराज आला धावून 

चहापानानंतर लिटन दास आणि टस्किन अहमदने आठव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचत बांगलादेशला 200 च्या पार पोहचवले. मात्र अखेर मोहम्मद सिराजने लिटन दासला 73 धावांवर बाद केले.

195-7 (60 Ov) : चहापान 

बांगलादेशचा झुंजार फलंदाज लिटन दासने नाबाद अर्धशतकी खेळी करत बांगलादेशला तिसऱ्या दिवशीचा टी टाईमपर्यंत 7 बाद 195 धावांपर्यंत पोहचवले. बांगलादेशकडे आता दुसऱ्या डावात 108 धावांची आघाडी आहे.

159-7 : अक्षर पटेलने तोडली भागीदारी

अक्षर पटेलने नुरूल हसनला 31 धावांवर बाद करत सातव्या विकेटसाठीची ही 46 धावांची भागीदारी तोडली.

113-6  : झाकीर हसनची पुन्हा झुंजार खेळी

बांगलादेशचा फलंदाज झाकीर हसन आपला दुसरा कसोटी सामना खेळत आहे. पदार्पणाच्या कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या झाकीरने दुसऱ्या कसोटीत देखील अर्धशतकी खेळी करत कडवी झुंज दिली. मात्र उमेश यादवे त्याला 51 धावांवर बाद करत त्याची अर्धशतकी खेळी संपवली. त्यानंतर अक्षर पटेलने मेहदी हसनला शुन्यावर बाद करत बांगलादेशला सहावा धक्का दिला.

71-4 (33 Ov) : लंच टाईम

भारताने बांगलादेशची दुसऱ्या डावात लंचपर्यंत 4 बाद 71 अशी अवस्था केली. जयदेव उनाडकटने शाकिबला 13 तर अक्षर पटेलने मुशफिकूरला 9 धावांवर बाद करत त्यांचे दोन अव्वल फलंदाज तंबूत धाडले.

जयदेव उनाडकटने बांगलादेशला दिला मोठा धक्का

25व्या षटकात जयदेव उनाडकटने शकीब अल हसनला बाद करत बांगलादेशला तिसरा धक्का दिला आहे. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर शाकिबने कव्हर्सवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू थेट शुभमन गिलच्या हातात गेला आणि बांगलादेशच्या कर्णधाराला जावे लागले. त्याने 36 चेंडूत 13 धावा केल्या

अश्विन अन् मोहम्मद सिराजचा कहर! 

बांगलादेशची दुसरी विकेट 26 धावांच्या स्कोअरवर पडली आहे. मोहम्मद सिराजने मोमिनुल हकला झेलबाद केले. मोमिनुलने नऊ चेंडूत पाच धावा केल्या. बांगलादेशची धावसंख्या 13 षटकांत 2 बाद 26 अशी आहे. आता कर्णधार शाकिब झाकीर हसनसोबत क्रीजवर आहे.

 अश्विन बांगलादेशला दिला पहिला धक्का!

बांगलादेशला दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने पहिला धक्का दिला आहे. त्याने नजमुल हसन शांतोला एलबीडब्ल्यू आऊट केले. शांतोने 31 चेंडूत पाच धावा केल्या.

आतापर्यंतच्या सामन्यात काय झालं ? 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या. बांगलादेशच्या 227 धावांना प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवात काही खास नव्हती. कर्णधार लोकेश राहुल 10 धावा करून बाद झाला. शुभमन गिल 20 धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताच्या चार विकेट 94 धावांत पडल्या होत्या.

यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. मात्र दोन्ही खेळाडूंचे शतक हुकले. पंतने 105 चेंडूत 93 तर अय्यरने 105 चेंडूत 87 धावा केल्या. या दोघांनी भारताची धावसंख्या 94/4 वरून 253/5 पर्यंत नेली. मात्र, पंत बाद होताच भारताचा डाव गडगडला. भारताने शेवटच्या सहा विकेट 62 धावांत गमावल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. तस्किन अहमद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

India vs Bangladesh 2nd Test Day 3 Live Cricket Score: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने बांगलादेशचा 231 धावात गुंडाळला. बांगलादेशकडून लिटन दास (73) आणि झाकीर हसनने (51) झुंजार फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान ठेवले. मात्र भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. बांगलादेशने तिसरा दिवस संपेपर्यंत 45 धावात भारताच्या 4 विकेट्स घेतल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी अजून 100 धावांची गरज आहे तर बांगलादेशला उद्या भारताच्या 6 विकेट्स घ्यायच्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com