IND vs BAN Test: 'त्याला घरीच बसवा...' रोहित बाबत माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs BAN Test

IND vs BAN Test: 'त्याला घरीच बसवा...' रोहित बाबत माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान

India vs Bangladesh Test Series 2022 : टीम इंडियाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा चट्टोग्राममध्ये बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर व्हावे लागले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर रोहित शर्मा 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात परत येऊ शकतो. पण आता शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराच्या शानदार शतकांनंतर त्यांचे पुनरागमन प्लेइंग इलेव्हनच्या निवडीसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

हेही वाचा: Aus Beat SA: पॅट कमिन्सच्या 'पंच', दोन दिवसात दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास; पडल्या 34 विकेट

रोहित शर्मा परतल्यावर कोण बाहेर बसणार असे विचारले असता, भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने चोख उत्तर दिले आहे. सोनी स्पोर्ट्सशी संवाद साधताना जडेजा म्हणाला की, 'मी रोहितला घरात बसायला सांगत आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या हाताला फ्रॅक्चर होते आणि तुम्ही सुमारे 10 दिवस बॅट धरू शकत नाही, तरीही तुम्ही बरे झालात तरीही तुम्ही दुसऱ्या दिवशी संघात सामील होऊ शकत नाही.

अजय जडेजा पुढे म्हणाला, आणखी 1 ते 15 दिवस लागतील. आणि दुखापत किती आहे हे अद्याप आम्हाला माहित नाही. म्हणूनच मी हे सुचवतो. आपण तात्पुरता उपाय शोधत आहोत आणि त्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून सुरू होणार असून हा या दौऱ्यातील शेवटचा सामना असेल.

हेही वाचा: FIFA WC22: 165 कोटींची किंमत; तरी वर्ल्डकप विजेत्याला मिळणार खोटी ट्रॉफी!

दुसरीकडे पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला आहे. पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराच्या 90 आणि श्रेयस अय्यरच्या 86 धावांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. टीम इंडियासाठी कुलदीप यादवने पहिल्या डावात सर्वाधिक 5 तर मोहम्मद सिराजने 3 बळी घेतले. 500 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात 324 धावांत गारद झाला. कुलदीप यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.