Ind vs Ban : पुण्यात गहुंजे स्टेडियममध्ये सुरक्षाव्यवस्थेची ऐशीतैशी; तिकीट नसतानाही प्रवेश

Ind vs Ban world cup 2023
Ind vs Ban world cup 2023sakal

Ind vs Ban world cup 2023 : एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पुण्यात गहुंजे स्टेडियममध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात सुरक्षाव्यवस्थेची ऐशीतैशी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या सामन्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेतून जावे लागत होते. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी ही व्यवस्था तापदायक ठरत असली तरी ती आवश्यक होती. यानंतरही ही सुरक्षाव्यवस्था भेदली गेली.

प्रसारमाध्यमांसाठी असलेल्या कक्षाच्या पाठीमागून दोन व्यक्ती आत शिरल्या आणि थेट प्रेक्षक गॅलरीत जाण्याच्या तयारीत होत्या. त्या वेळी एका अधिकाऱ्याला संशय आल्याने त्याने त्यांना हटकले. तेव्हा त्या दोन व्यक्तींना काहीच उत्तरे देता येत नव्हती. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पाचारण करून त्या व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या व्यक्ती मूळ राजस्थानच्या असल्याचे सांगत होते.

अखेर त्या दोघांना स्टेडियममधील पोलिस नियंत्रण कक्षात नेऊन चौकशी केली असता त्यांचे वास्तव्य कोंढवा येथील असल्याचे या व्यक्तींनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com