IND Vs BAN World Cup : विराटचे वर्ल्डकपमधील पहिले शतक; भारताचा विजयी चौकार

IND Vs BAN World Cup : विराटचे वर्ल्डकपमधील पहिले शतक; भारताचा विजयी चौकार

IND Vs BAN World Cup: भारताने बांगलादेशचे 257 धावांचा आव्हान 42 व्या षटकात पार करत वर्ल्डकपमधील आपला विजयी चौकार लगावला. भारताकडून विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक ठोकले. त्याने 97 चेंडूत 103 धावा केल्या. त्याने आपले शतक षटकार मारत पूर्ण केले. शुभमन गिलने 53 धावा केल्या तर रोहितने 48 धावा करत धडाकेबाज सुरूवात करून दिली.

पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत - बांगलादेश सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 256 धावांपर्यंतच मजल मारता आली. लिटन दास (66) आणि तन्जिद हसन (51) यांनी 93 धावांची सलामी दिली.

मात्र त्यानंतर बांगलादेशचा डाव गडलगडला. स्लॉग ओव्हरमध्ये महोम्मदुल्ला आणि मुशफिकूर रहीम यांनी थोडा प्रतिकार केला त्यामुळे बांगलादेशला 250 धावांच्या जवळ पोहचता आले. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाने 2 विकेट्स घेतल्या.

विराट कोहलीचे शतक भारताचा शानदार विजय 

भारताची रन मशिन विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक ठोकले. त्याने 97 चेंडूत 103 धावा करत भारताला 43 व्या षटकात विजय मिळवून दिला.

 धावांची IND 194/3 (32.2) : विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण करत भारताला विजयीपथावर पुढे नेले. त्याला श्रेयस अय्यरने 19 धावांची भर घातली. मात्र मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. विराट कोहलीने केएल राहुलच्या साथीने भारताला 33 षटकात 200 धावांचा टप्पा पार करून दिला.

88-1 : रोहित शर्माचे अर्धशतक हुकले. 

भारताचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शुभमन गिलने गिअर बदलला. त्याने आक्रमक फलंदाजी करत रोहितची बरोबरी केली. रोहित देखील आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. मात्र हसन महमुदने त्याला 48 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

62-0 (9.4 Ov) : गिलने गिअर बदलला

भारताचे 9 व्या षटकात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शुभमन गिलने आपला गिअर बदलला. गिलने नसुनच्या षटकात दोन षटकार मारत आपले रनरेट वाढवले.

47-0 (7.2 Ov) : भारताची आक्रमक सुरूवात 

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बांगलादेशच्या 257 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली. रोहित शर्माने फटकेबाजी सुरू केली तर त्याला गिलने सावध साथ देण्यास सुरूवात केली.

248-8 : मोहम्मदुल्लाची फटकेबाजी 

बांगलादेशच्या मोहम्मदुल्लाने स्लॉग ओव्हरमध्ये 36 चेंडूत 46 धावा ठोकत बांगलादेशला 250 धावांपर्यंत पोहचवले.

201-6 (42.3 Ov) : मुशफिकूर रहिमची झुंजार खेळी मात्र बुमराहने दिला धक्का

बांगालदेशचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहीमने 38 धावांची झुंजार खेळी करत संघाचे द्विशतक धावफलकावर लावले. मात्र जसप्रीत बुमराहने रविंद्र जडेजाकरवी मुशफिकूरला बाद करत बांगलादेशला सहावा धक्का दिला.

137-4 : जडेजाने दिला मोठा धक्का 

रविंद्र जडेजाने बांगलादेशचा सेट झालेल्या लिटन दासला 66 धावांवर बाद केले.

129-3 : सिराजनेही उघडले खाते 

मोहम्मद सिराजने बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजला 3 धावांवर बाद करत बांगलादेशला तिसरा धक्का दिला. सेट झालेल्या लिटन दासने अर्धशतकी खेळी करत एक बाजू लावून धरली आहे.

110-2 : जडेजाने केली कर्णधाराची शिकार 

बांगलादेशचा कर्णधार नजमुल होसैन शान्तोला 8 धावांवर धावबाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला.

BAN 92/0 (14.2) :तन्जिदचे अर्धशतक मात्र कुलदीपने फोडली जोडी

बांगलादेशचा सलामीवीर तन्जिदने 41 चेंडूत अर्धशतक ठोकत बांगलादेशला 14.2 षटकात 92 धावांपर्यंत पोहचवले. मात्र लिटन दास आणि तन्जिद यांची ही भागीदारी अखेर कुलदीप यादवने फोडली. त्याने तन्जिदला 51 धावांवर बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला.

हार्दिक पांड्याला दुखापत, विराटने केली गोलंदाजी 

सामन्याचे नववे षटक टाकणारा हार्दिक पांड्या तीन चेंडू टाकून दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याचे उरलेले तीन चेंडू हे विराट कोहलीने टाकले आणि षटक पूर्ण केले. पायाला दुखापत झाल्याने हार्दिक बाहेर गेला आहे.

बांगलादेशची आक्रमक सुरूवात 

बांगलादेशचे सलामीवीर लिटन दास आणि तन्जिद हसन यांनी आक्रमक सुरूवात करत बांगलादेशला आठ षटकात 45 धावांपर्यंत मजल मारून दिली.

  बांगलादेशकडून डावाला सुरुवात! कर्णधार संघातून बाहेर, भारतात नाही कोणताही बदल

बांगलादेशचे सलामीवीर लिटन दास आणि तनजीद हसन क्रीजवर आले आहेत. जसप्रीत बुमराह भारतासाठी पहिले षटक टाकले. दोन षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या एकही विकेट न गमावता पाच धावा आहे.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे  

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश : लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), नसुम अहमद, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

बांगलादेश नाणेफेक जिंकून घेतला 'हा' निर्णय! कर्णधार शकिब अल हसन बाहेर, जाणुन घ्या भारताची प्लेइंग-11

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शकीब अल हसन बांगलादेशकडून खेळत नाही. त्याच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. शाकिब हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जागी नजमुल हसन शांतो कर्णधार आहे.

त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने म्हणाला की, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणार होतो. अशा स्थितीत नाणेफेक हरल्यानंतरही फारसे नुकसान झाले नाही. रोहितने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com