Video: 'स्विंगमास्टर' बुमराह! पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bumrah-swing-LBW

Video: 'स्विंगमास्टर' बुमराह! पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का

IND vs ENG 1st Test: भारतीय संघाविरूद्ध इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण पहिल्याच षटकात त्यांच्या निर्णयाला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सुरूंग लावला. बुमराह सामन्याचे पहिलेवहिले षटक टाकण्यासाठी आला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने टाकलेला चेंडू टप्पा पडून अचानक स्विंग झाला. चेंडू पटकन स्विंग झाल्याने इंग्लंडचा फलंदाज रॉरी बर्न्स फटका खेळूच शकला नाही. त्यामुळे तो पायचीत झाला आणि संघाला पहिला धक्का बसला.

पाहा स्विंगमास्टर बुमराहचा तो चेंडू-

हेही वाचा: IND vs ENG: राहुलला संघात स्थान; दोन बडे खेळाडू संघाबाहेर

दरम्यान, भारतीय संघाविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांची कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याआधी भारतीय संघाचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्या जागी लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे. तर रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा या दोन बड्या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले असून मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळाले आहे. याचसोबत मराठमोळ्या शार्दूल ठाकूरलाही संघात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: व्वा पठ्ठ्या! रविनं प्रतिस्पर्ध्याला दाखवलं आस्मान; आणखी एक पदक निश्चित

भारताचा संपूर्ण संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top