व्वा पठ्ठ्या! रविनं प्रतिस्पर्ध्याला दाखवलं आस्मान; आणखी एक पदक निश्चित

त्याच्या या विजयामुळे आता भारताचे चौथे पदक पक्के झाले आहे..
Ravi Kumar Dahiya
Ravi Kumar Dahiya

ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी दमदार असाच आहे. कुस्तीमध्ये रवि कुमार दाहियाने कझाकिस्तानच्या पैलवानाला चितपट करत 57 किलो फ्रीस्टाइल वजनी गटात फायनलचं तिकीट पक्के केले. त्याच्या या विजयामुळे आता भारताचे चौथे पदक पक्के झाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 57 किलो वजनी गटात पैलवान रवि याआधीच्या लढतीत त्याने कोलंबियाच्या टिग्रेशला मात दिली होती. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्ध्यावर ताबा मिळवून तो गुण मिळवताना दिसला. ही लढत त्याने 13-2 अशी तांत्रिक गुणांवर एकतर्फी जिंकली होती.

सुशील कुमारनंतर फायनलमध्ये पोहचणारा तो दुसरा पैलवान ठरलाय. 57 किलो वजनी गटात 6-6 मिनिटांचे दोन राउंड ढाले. पहिल्या राउंडमध्ये आघाडी मिवल्यानंतर कझाकिस्तानच्या पैलवानाच्या डावात रवि कुमार फसला. तो 7 गुणांनी पिछाडीवर पडला. पण यातून सावरत त्याने विजयी डाव साधला.

Ravi Kumar Dahiya
Olympics : कोरोनावर मात अन् 'ब्राँझ पंच' लवलिनाबद्दल 5 खास गोष्टी

अखेरच्या 50 सेकंदात टाकल विजयाचा डाव

फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाल्यानंतर अखेरच्या 50 सेकंदात रवि कुमार दाहियाने विजयी डाव खेळला. या विजयासह त्याचे रौप्य पदक पक्के झाले आहे. एवढ्यावर समाधान न मानता तो सुवर्ण डाव टाकण्यासाठी आखाड्यात उतरेल.

Ravi Kumar Dahiya
Olympics : कोरोनावर मात अन् 'ब्राँझ पंच' लवलिनाबद्दल 5 खास गोष्टी

दीपक पुनिया-अंशू मिलिक पराभवानंतरही पदकाच्या शर्यतीत

दीपक पुनियाला 86 किलो वजनी गटात सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याला अमेरिकन पैलवान मॉरिस डेविड टेलरने 10-0 अशी मात दिली. त्याच्या शिवाय महिला कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटात अंशू मलिकलाही पराभवाचा सामना करावा लागला. दीपक पुनिया आणि अंशू मलिक पराभूत झाले असले तरी ते अजूनही पदकाच्या शर्यतीत आहेत. रेपचेज रांउडमध्ये या दोघांना कांस्य पदकावर नाव मिळण्याची संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com