Video: पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे काय झालं पाहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh-Pant-Virat-DRS

Video: ऋषभ पंत मागेच लागला, मग विराटने घेतला DRS अन् पुढे...

मैदानावर घडला मजेशीर किस्सा, कोहलीलाही हसू आवरेना...

इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह उतरला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या चौघांना संघात स्थान मिळाले. त्यासोबत जाडेजाही संघात कायम राहिला. बुमराहने पहिल्याच षटकात आपल्या स्विंगचा कमाल दाखवत सलामीवीर रॉरी बर्न्सला माघारी पाठवलं. त्यानंतर जॅक क्रॉलीच्या साथीने डॉम सिब्लीने डाव पुढे नेला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्याचवेळी मैदानावर एक मजेशीर किस्सा घडला.

पाहा व्हिडीओ-

हेही वाचा: Video: 'स्विंगमास्टर' बुमराह! पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का

नक्की काय घडलं?

मोहम्मद सिराजची गोलंदाजी सुरू होती. त्यावेळी षटकाच्या चौथ्या चेंडूवर सिराजचा स्विंग झालेला चेंडू क्रॉलीच्या बॅटजवळून पॅडला घासून गेला. तेव्हा विराटने विश्वासाने अपील केले पण अंपायरने नाबाद ठरवल्यानंंतर विराटने DRS घेतला आणि तो फुकट गेला. त्याच्या दोनच चेंडूनंतर पुन्हा चेंडू स्विंग झाला आणि पंतने झेल पकडला. यावेळी विराटला समजेना की DRS घ्यावा की घेऊ नये. त्यावेळीच ऋषभ पंतने अतिशय पोटतिडकीने विराटला DRS साठी मनवलं. पंत मागेच लागलेला पाहून विराटने DRS तर घेतला. पण दोन चेंडूंपूर्वीच एक DRS वाया गेला असल्याने सगळेच गोंधळलेले होते. अखेर ज्यावेळी रिव्ह्यू पाहिला गेला तेव्हा चेंडू बॅटला लागल्याचे निष्पन्न झाले आणि त्यामुळे क्रॉलीला माघारी परतावे लागले.

हेही वाचा: IND vs ENG: राहुलला संघात स्थान; दोन बडे खेळाडू संघाबाहेर

DRS च्या या प्रकारानंतर पंतचा सोशलमिडियावर उदो उदो करण्यात आला. काहींनी पंतचे मजेशीर फोटोदेखील पोस्ट केले.

भारताचा संपूर्ण संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

loading image
go to top