Sachin Tendulkar Sourav Ganguly Lords Stadium : End vs Ind सामना पाहण्यासाठी 'दादा' अन् 'मास्टर' लॉर्ड्सवर : पाहा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sachin tendulkar sourav ganguly attendting lords see photo

End vs Ind सामना पाहण्यासाठी 'दादा' अन् 'मास्टर' लॉर्ड्सवर : पाहा फोटो

India vs England 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून श्रेयस अय्यरच्या जागी माजी कर्णधार विराट कोहलीला आणले आहे. इंग्लंड संघात कोणताही बदल झालेला नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिल्या सामन्यात 10 विकेटने विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (sachin tendulkar sourav ganguly attendting lords see photo)

हेही वाचा: Eng vs Ind 2nd ODI Live: चहलच्या जाळ्यात अडकले इंग्लंडचे फलंदाज; 150/6

भारत आणि इंग्लंडचा दुसरा जबरदस्त सामना पाहण्यासाठी भारतीय दिग्गज खेळाडूही लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर पोहोचले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर दुसऱ्या सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडशी अनेक आठवणी जोडलेल्या आहेत.

टीम इंडियाने एक दिवस आधी म्हणजेच 13 जुलै 2002 रोजी नॅटवेस्ट मालिका जिंकून इतिहास रचला होता. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिनची बॅट चालले नाही. तो फक्त 14 धावा करून बाद झाला, तर गांगुलीने 60 धावा केल्या. ही फायनल युवराज आणि कैफ यांच्यातील भागीदारीसाठी ही लक्षात राहिली आहे. यापूर्वी सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त सचिन दादा एकत्र दिसले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या सामन्याबद्दल बोलायचे तर कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. 33 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 6 बाद 159 अशी आहे. भारताकडून युझवेंद्र चहलने आतापर्यंत तीन आणि हार्दिक पांड्याने दोन तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली आहे.

Web Title: Ind Vs Eng 2nd Odi Sachin Tendulkar Sourav Ganguly Attendting Lords Stadium See Photo India Vs England Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..