IND vs ENG: "म्हणूनच शक्य असूनही अश्विनला संघात घेतलं नाही"

IND vs ENG: म्हणून शक्य असूनही अश्विनला संघात घेतलं नाही- विराट अश्विनला संघातून वगळल्यामुळे विराटवर टीकेचा भडीमार Ind vs Eng 2nd Test at Lords Virat Kohli Explains why Ashwin dropped from Team India over Ishant Sharma vjb 91
Ashwin-Virat
Ashwin-Virat
Updated on

अश्विनला संघातून वगळल्यामुळे विराटवर टीकेचा भडीमार

Ind vs Eng 2nd Test: भारत विरूद्ध इंग्लंड पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या आधी वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी कोण खेळणार याची चर्चा होती. इशांत शर्मा आणि रवि अश्विन या दोघांपैकी एकाला ही संधी मिळणार हे नक्की होते, अशा वेळी भारतीय संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरच्या जागी अनुभवी इशांत शर्माला संधी मिळाली. शार्दूलला संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या जागी अश्विनला संघात संधी मिळेल अशी आशा चाहत्यांना होती. पण तसे झाले नाही. विराटने स्वत: अश्विनला संघात न घेण्याचं कारण सांगितले.

Ashwin-Virat
पहिला बॉल ट्रायल असतो यार.. चाहत्यांकडून विराट भन्नाट ट्रोल

"आमच्याकडे १२ खेळाडू होते. त्यातून आम्हाला ११ निवडायचे होते. १२ खेळाडूंच्या यादीत अश्विन होता. त्यामुळे त्याला निवडणे शक्य होते. पण शक्य असूनही आम्ही अश्विनला संघात निवडलं नाही. कारण लॉर्ड्सचे मैदान आणि पिच पाहता आम्ही इशांतला घेण्याचा निर्णय घेतला. पिचवरील गवत, सध्याचे येथील वातावरण आणि वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी या साऱ्याचा विचार आम्ही इशांतला संधी दिली. अश्विनला नाकारण्यासारखे काहीच नव्हते. पण ४ वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरण्याचा आमचा फॉम्युला आहे, त्यानुसार इशांतची संघात निवड करण्यात आली", असे स्पष्टीकरण विराटने दिले.

Ashwin-Virat
IND vs ENG: कोहली भाऊ, तुमचं चाललंय काय? नेटकरी विराटवर भडकले

भारताचा संपूर्ण संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज

इंग्लंडच्या संघात तीन महत्त्वाचे बदल

अनुभवी फिरकीपटू मोईन अली आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड या दोघांना संधी मिळाली. त्यासोबतच नवख्या हसीब हमीद यालाही स्थान मिळाले. डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक क्रॉली या तिघांना संघाबाहेर ठेवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com