IND vs ENG कसोटी मालिकेत गावसकरांना खटकतेय एक गोष्ट; जाणून घ्या

IND vs ENG कसोटी मालिकेत गावसकरांना खटकतेय एक गोष्ट; जाणून घ्या सामन्याची कॉमेंट्री करत असतानाच थेट व्यक्त केली नाराजी Ind vs Eng 2nd Test Team India legend Sunil Gavaskar explains need for neutral umpires in Test Series vjb 91
gavaskar
gavaskar
Updated on

Ind vs Eng 2nd Test: भारतीय संघाविरूद्ध इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने दमदार दीडशतक ठोकले. त्याने एकाकी झुंज देत १८० धावांची जोरदार खेळी केली. त्याच्या फलंदाजीच्या वेळी एकदा त्याच्या पायाला चेंडूला लागला आणि तो पायचीत असल्याचा विश्वास असल्याने भारतीयांनी अपील केले. पण अंपायरने त्याला नाबाद ठरवले. भारतीय संघाने DRSचा आधार घेतला. त्यात चेंडू स्टंपला लागत असला तरीही नियमानुसार पंचांचा निर्णय असल्याचे (Umpire's Call) सांगण्यात आले. या मुद्द्यावर सोशल मिडीयावर टीकेची झोड उठली याच मुद्द्यावर भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

gavaskar
IND vs ENG: पुजाराच्या जागी भारताने 'या' खेळाडूला संधी द्यावी!

इंग्लंड-भारत कसोटी सामन्यात सध्या सुरू असलेली अंपायरिंग तसेच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेली अंपायरिंग ही खूप दर्जेदार आहे यात वादच नाही. आमच्या वेळी जे व्हायचं त्यापेक्षा हे खूपच चांगलं आहे. पण माझं असं स्पष्ट मत आहे की अंपायरिंयमधील पक्षपाती पूर्णपणे घालवण्यासाठी जे दोन संघ खेळत असतील त्या देशाचे सोडून इतक देशांचे पंच अंपायरिंगसाठी उभे असावेत. खेळात तटस्थपणा आवश्यक असतो. अंपायर तटस्थ असतील कोणीही त्यावरून काही बोलणार नाही", असे गावसकर म्हणाले.

Team-India
Team-India
gavaskar
पहिला बॉल ट्रायल असतो यार.. चाहत्यांकडून विराट भन्नाट ट्रोल

"महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या वाटचे २-३ DRS संपवता त्यानंतर मात्र तुमच्याकडे अंपायरचा निर्णय मानण्यापलीकडे काहीच शिल्लक उरत नाही. आणि त्यातलाच एखादा निर्णय हा सामन्याचा अख्खा कल बदलणारा ठरू शकतो. त्यामुळे तटस्थ पंच असणं हे कधीही चांगलं", असे स्पष्ट मत गावसकर यांनी मांडलं.

प्रत्येक कसोटी मालिकेत यजमान देशाचे पंच असावेत असा सुरुवातीला नियम होता. त्यानंतर १९९४मध्ये मैदानावरील दोन पैकी किमान एक पंच तटस्थ असावा असा नियम करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये मैदानावरील दोन्ही पंच तटस्थ असावेत असा नियम ठरवण्यात आला. पण सध्या कोरोनामुळे प्रवासावर बंधने आली आहेत. अशा परिस्थितीत यजमान देशाचे पंच अंपायरिंग करत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com