Ind vs Eng : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तोंडावर टीम इंडियाला मोठा धक्का! KL राहुल बाहेर, 'या' खेळाडूला मिळणार संधी?

Ind vs Eng 3rd test KL Rahul ruled out of third Test against England Devdutt Padikkal to replace : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Ravindra Jadeja & KL Rahul India vs England Test Series News Marathi
Ravindra Jadeja & KL Rahul India vs England Test Series News Marathi

India vs England 3rd test KL Rahul Ruled Out : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यानंतर यजमान भारताने विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी जिंकली. अशाप्रकारे मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आता दोन्ही संघांची नजर राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आघाडीवर असेल.

Ravindra Jadeja & KL Rahul India vs England Test Series News Marathi
Jasprit Bumrah : बुमराह इंग्लंडविरुद्धच्या 'या' कसोटी सामन्यातून बाहेर? BCCI च्या सूत्राने दिली माहिती

पण त्याआधी भारती संघाला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने पुढील तीन कसोटी सामन्यांची घोषणा करताना अट घातली होती की, तो तंदुरुस्त झाला तरच खेळणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केएल राहुल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. केएल राहुलच्या जागी देवदत्त पडिक्कलला संघात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

Ravindra Jadeja & KL Rahul India vs England Test Series News Marathi
Ind vs Eng : 'ही लाजिरवाणी गोष्ट...' इंग्लंडच्या माजी दिग्गजाने विराट कोहली न खेळण्यावर केलं मोठं वक्तव्य

केएल राहुलने पहिली कसोटी खेळला होता, ज्यात तो जखमी झाला. पहिल्या कसोटीदरम्यान राहुलने उजव्या मांडीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. आता तिसऱ्या कसोटीतही खेळणार नाही. अलीकडेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला होता.

राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीनंतर पुनरागमन करत असल्याचे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले होते. पण त्यांना फिटनेस सिद्ध करावा लागेल, तरच ते सामना खेळू शकेल. चौथ्या कसोटीत तो खेळू शकेल, अशी अपेक्षा आहे.

Ravindra Jadeja & KL Rahul India vs England Test Series News Marathi
Ishan Kishan : इशान किशनला 'ती' चूक भोवणार? BCCI देणार दणका, मोठ्या कारवाईची शक्यता

भारतीय खेळाडू तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी 12 फेब्रुवारीला राजकोटला आला आणि सरावाला सुरुवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने निवडकर्त्यांना सांगितले आहे की राहुलला किमान आठवडाभर निरीक्षणाखाली राहावे लागेल. त्यानंतरच तो चौथ्या कसोटीत खेळू शकेल की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com