esakal | IND vs ENG: भारतीय गोलंदाजांचे सुपर-कमबॅक; विजयापासून फक्त दोन पावलं दूर
sakal

बोलून बातमी शोधा

Ind-Bumrah-Clean-Bowled

भारतीय गोलंदाजांचे 'सुपर-कमबॅक'; विजयापासून फक्त दोन पावलं दूर

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng 4th Test Live Updates Tea Break: इंग्लंडचे सहा गडी झटपट माघारी

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाने यजमानांना ३६८ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना फारसे यश मिळाले नाही. इंग्लंडने पहिल्या सत्रात ५४ धावांची भर घातली. भारताला केवळ दोन बळी घेता आले. पण त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तब्बल सहा बळी टिपले आणि सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर संघाला नेऊन ठेवले. २ बाद १३१ या धावसंख्येवर दुसरे सत्र खेळायला आलेला इंग्लंडचा संघ ८ बाद १९३ धावांवर चहापानाच्या विश्रांतीसाठी तंबूत गेला. जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाने दमदार कामगिरी केली.

२ बाद १३१ या धावसंख्येवर इंग्लंड दुसरे सत्र खेळण्यास उतरले. कर्णधार जो रूट संयमी खेळ करत होता. पण अर्धशतकवीर हसीब हमीद मात्र चकला. जाडेजाने त्याला ६३ धावांवर त्रिफळाचीत केला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने ओली पोप (२) आणि जॉनी बेअरस्टो (०) दोघांना लगेच त्रिफळा उडवत माघारी धाडले. पाठोपाठ मोईन अलीला शून्यावर जाडेजाने तंबूत पाठवले. जो रूट शांत व संयमी खेळ करत होता. पण बाहेरचा चेंडू मारताना बॅटची कड लागून तोदेखील त्रिफळाचीत झाला. रूटने ३६ धावा केल्या. त्यानंतर उमेश यादवने क्रेग ओव्हरटनला आपल्या जाळ्यात अडकवून झेलबाद केले. त्यामुळे चहापानापर्यंत इंग्लंडची अवस्था ६ बाद १९३ अशी झाली.

loading image
go to top