IND vs ENG: विराटचं करायचं तरी काय? रूटने कॅच सोडला तरीही...

Joe-Root-Virat-Kohli
Joe-Root-Virat-Kohli

विराट २२ धावांवर असताना जो रूटकडून त्याचा झेल सुटला

Ind vs Eng 4th Test : तिसऱ्या सामन्यात दारूण पराभूत होणाऱ्या भारताची (Team India) चौथ्या कसोटीतही सुरुवात खराबच झाली. संघाचे शतक गाठेपर्यंत निम्म्या संघाला माघारी परतावे लागले. रोहित, राहुल, पुजारा, जाडेजा आणि कर्णधार विराट (Virat Kohli) सारे बाद झाले. विराट कोहलीने झुंजार अर्धशतकी खेळी केली खरी पण त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. 'दैव देतं अन् कर्म नेतं' या उक्तीप्रमाणे विराटची चौथ्या कसोटीतील पहिल्या डावाची खेळी होती.

भारताने पहिल्या सत्रात तीन फलंदाज गमावले. त्यानंतर रविंद्र जाडेजाला बढती देण्यात आली. पण तोदेखील स्वस्तात माघारी परतला. मग कर्णधार कोहली आणि उपकर्णधार रहाणे यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. २२ धावांवर असताना कोहलीच्या बॅटला कट लागून चेंडू जो रूटकडे गेला होता, पण त्याला तो झेल टिपता आला नाही. जीवनदान मिळाल्यानंतर कोहली मोठी खेळी करेल असं वाटत होतं. त्यानुसार, त्याने अर्धशतक झळकावलं. पणअर्धशतक साजरं करताच तो ओली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या मालिकेत रॉबिन्सनने कोहलीला तिसऱ्यांदा बाद केले. कोहलीने ९६ चेंडूत ८ चौकारांसह ५० धावा केल्या.

Joe-Root-Virat-Kohli
विराट, शास्त्री.. तुमचं गलिच्छ राजकारण थांबवा; नेटकरी संतापले

तत्पूर्वी, टॉस जिंकून जो रूटने भारताला फलंदाजी दिली. रोहित आणि राहुल या सलामी जोडीने सुरूवात चांगली केली होती. पण एका अचानक बाऊन्स झालेल्या चेंडूवर रोहित बाद झाला. त्याने ११ धावा केल्या. पाठोपाठ राहुलही १२ धावांवर पायचीत झाला. DRSमध्ये पंचांचा कॉल (Umpires Call) अंतिम ठरल्याने भारताचा रिव्ह्यू शाबूत राहिला पण राहुलला माघारी जावे लागले. त्यानंतर चेतेश्वर पुजारादेखील जेम्स अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीचा शिकार झाला. त्याला केवळ ४ धावाच करता आल्या. त्यानंतर विराटची साथ करण्यासाठी रविंद्र जाडेजाला पाठवण्यात आले. पण जाडेजादेखील १० धावा काढून माघारी परतला.

div class="dm-player" playerId="x1ygm" owners="Sakal" sort="relevance,recent" keywordsselector="h1.news-title" showInfoCard="true">

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com