esakal | विराट, शास्त्री.. तुमचं गलिच्छ राजकारण थांबवा; नेटकरी संतापले
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Ravi-Shastri

विराट, शास्त्री.. तुमचं गलिच्छ राजकारण थांबवा; नेटकरी संतापले

sakal_logo
By
विराज भागवत

ट्विटरवरून दोघांवरही सडकून टीका; वाचा प्रकरण सविस्तर

Ind vs Eng 4th Test: टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात रविचंद्रन अश्विनला (Ashwin) स्थान देण्याबाबत सोशल मिडीयावर (Social Media) अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण भारतीय संघाने दोन बदल करूनही त्यात अश्विनला संधी देण्यात आली नाही. शमी आणि इशांतच्या जागी शार्दूल आणि उमेश यादवला (Umesh Yadav) संघात स्थान दिले. तसेच, रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) फिरकीपटू म्हणून चांगली कामगिरी करू शकेल असं उत्तर विराटने दिलं. अश्विनला संधी न देता उमेश यादवला संघात स्थान दिल्यामुळे सोशल मिडीयावर विराट (Virat Kohli) आणि कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर चाहत्यांनी प्रचंड टीका करण्यात आली. तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी (Dirty Politics) अश्विनचा बळी देऊ नका, अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: IND vs ENG 4th Test: इशांत, शमी संघाबाहेर; पाहा Playing XI

पाहा काही निवडक संतप्त प्रतिक्रिया-

हेही वाचा: IND vs ENG: म्हणून अश्विनला संघात घेतलं नाही- विराट कोहली

दरम्यान, अश्विनला संघात स्थान का दिलं गेलं नाही, यावर विराट कोहलीने उत्तर दिलं. "इंग्लंडच्या संघात चार डावखुरे फलंदाज आहेत. आमचे वेगवान गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी करतात. त्यांच्या पायांच्या ठशाचा उपयोग जाडेजाला जास्त होऊ शकतो. तसेच, आमची सलामी जोडी दमदार खेळ करत आहे. अशा वेळी फलंदाजीत दम असायला हवा. त्यासाठी जाडेजाला संघात कायम ठेवण्यात आले आहे. सध्या या मालिकेतील काही दिवसांचाच खेळ शिल्लक आहे. मालिका उत्तम वळणावर आहे. अशा वेळी आम्ही आता कोणतीही जोखीम उचलण्यास तयार नाही", असे विराटने सांगितले.

loading image
go to top