esakal | IND vs ENG: शेवटची कसोटी रद्द झाल्यावर BCCI ची ECB ला नवी ऑफर
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

IND vs ENG: शेवटची कसोटी रद्द झाल्यावर BCCI ची ECB ला नवी ऑफर

sakal_logo
By
विराज भागवत

कोरोनाच्या शिरकावामुळे पाचवी कसोटी रद्द

कोरोना संसर्गाच्या भीतीने टीम इंडियाच्या गोटात खळबळ माजली असतानाच पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय BCCIच्या संमतीने घेतल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. पण प्रत्येक खेळण्यात येणारा प्रत्येक कसोटी सामना हा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना हा पूर्णपणे रद्दबातल न करता दोन्ही संघांसाठी सोयीच्या असलेल्या अशा एका कालावधीत तो खेळवला जावा, अशी ऑफर BCCI ने ECB ला दिली आहे. BCCI ने याबद्दलचे एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी याची माहिती दिली आहे.

हेही वाचा: IND vs ENG: पाचवा कसोटी सामना रद्द! BCCI- ECB चर्चेनंतर निर्णय

"भारतीय चमूतील काहींना कोरोनाची बाधा झाल्याने पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. पण हा कसोटी सामना दोन्ही संघातील खेळाडूंच्या सोयीनुसार पुनर्नियोजित करावा अशी विनंती आम्ही ECB ला केली आहे. BCCI आणि ECB यांच्यातील व्यावहारिक संबंध सलोख्याचे आहेत. त्यामुळे ही विनंती करण्यात आली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खेळण्याचा योग्य कालावधी कोणता असावा, याबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्डांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि सुरक्षितता याला BCCI ने कायमच प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे सामन्याबाबत निर्णय घेण्यात आला", असे BCCIच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: इशान किशनची 'टीम इंडिया'त निवड; 'या' हॉट मॉडेलची रंगली चर्चा

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या २-१ अशा स्थितीत आहे. पहिल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने १५१ धावांनी इंग्लंडवर मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्या पुढच्याच सामन्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि ७६ धावांनी धूळ चारत मालिका बरोबरीत आणली. पण अखेर चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा १५७ धावांनी विजय झाला आणि टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

loading image
go to top