esakal | IND vs ENG : 250 + टार्गेट अन् टीम इंडियाला जिंकण्याची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

IND vs ENG : 250 + टार्गेट अन् टीम इंडियाला जिंकण्याची संधी

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India, 4th Test : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अजूनही पिछाडीवर आहे. भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 191 धावाच केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाने धावफलकावर 43 धावा लावल्या होत्या. केएल राहुल (KL Rahul) 22 आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 20 दुसऱ्या दिवसाअखेर नाबाद खेळत होते. अजूनही इंग्लंडकडे 56 धावांची आघाडी आहे. जर टीम इंडियाला हा कसोटी सामना जिंकायचा असेल तर इंग्लंडसमोर किमान 250 धावांचं टार्गेट द्याव लागेल.

लंडन येतील ओव्हलच्या मैदानात चौथ्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारतीय संघाच्या नावेच आहे. 1979 च्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने 8 विकेटच्या मोबदल्यात 429 धावा करुन मॅच ड्रॉ केली होती. या सामन्यात सुनील गावसकर यांनी 221 धावांची खेळी केली होती. याशिवाय 1947 मध्ये दक्षिण अफ्रिकेच्या संघाने 7 बाद 423 धावा करत सामना अनिर्णित राखला होता.

हेही वाचा: IND vs ENG : टीम इंडिया पिछाडीवरुन धमाका करण्यात माहिर; पण...

ओव्हलच्या घरच्या मैदानात चौथ्या डावात इंग्लंडचे रेकॉर्ड खास नाही. चौथ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने 263 ही सर्वोच्च धावसंख्या केली आहे. 1902 मध्ये इंग्लंडेन ही कामगिरी नोंदवली होती. याशिवाय दोनवेळाच इंग्लंडच्या संघाने चौथ्या डावात 300 + धावांचा पाठलाग करताना सामना वाचवण्यात यश मिळवले आहे. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया विरुद्ध इंग्लंडने चौथ्या डावात 6 बाद 369 धावा केल्या होत्या. तर 1965 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या डावात 308 धावा करत सामना अनिर्णित राखला होता.

loading image
go to top