esakal | IND vs ENG : टीम इंडिया पिछाडीवरुन धमाका करण्यात माहिर; पण...
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

IND vs ENG : टीम इंडिया पिछाडीवरुन धमाका करण्यात माहिर; पण...

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India, 4th Test at Kennington Oval, London : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना लंडन येथील द ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव 191 धावांत आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावालाही सुरुवात केलीये. यजमान इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 290 धावा केल्या. इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनीही चौथ्या कसोटी सामन्यात नांगी टाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग तीन कसोटी सामन्यात तीन शतके झळकवणारा ज्यो रुट अवघ्या 21 धावा करुन परतल्यानंतर भारतीय संघ सामन्यावर मजबूत पकड घेईल असे चित्रही निर्माण झाले.

पण...भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदाच संधी मिळालेल्या ओली पोप आणि क्रिस वोक्स जोडीने भारताची सर्व गणितं बिघडवली. ओली पोपने 159 चेंडू खेळून 81 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला क्रिस वोक्सने 60 चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांच्याशिवाय जॉनी बेयरस्टोनं 37 धावांची खेळी केली. शार्दूल ठाकूरने शतकाकडे वाटचाल करणाऱ्या ओली पोपला तंबूत धाडले. इंग्लंडच्या या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 99 धावांची आघाडी घेतली.

हेही वाचा: Video: विराट-जाडेजाचा 'मास्टरप्लॅन'; फिल्डिंग बदलली अन्...

भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाने बिन बाद 43 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा (Rohit Sharma) 20 (56) आणि केएल राहुल (KL Rahul) 22 (41) खेळत होते. ही जोडी पिछाडी भरुन काढत टीम इंडियाला आघाडी मिळवून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सामन्यात पुन्हा कमबॅक करायचे असेल तर सलामीच्या जोडीला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. याशिवाय मध्यफळीतील फलंदाजांनाही मागील चुका टाळून आश्वासक खेळी साकारावी लागेल. पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली आणि शार्दूल ठाकूर वगळता अन्य एकालाही नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता.

हेही वाचा: जारवो पुन्हा मैदानात; यावेळी थेट बॉलिंगच टाकली... पाहा VIDEO

नॉटिंघम येथील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानात टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर यजमानांनी दमदार कमबॅक करत लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला 76 धावा आणि डावाने पराभूत करत मालिका बरोबरीत आणली. दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियापेक्षा इंग्लंडचे पारडे जड असले तरी भारतीय संघ दमदार कमबॅक करण्यात माहिर आहे. दुसऱ्या डावात पिछाडी भरुन काढून विजयासाठी इंग्लंडसमोर मोठे टार्गेट ठेवण्यासाठी टीम इंडिया निश्चितच सक्षम आहे. पण त्यासाठी रोहित-लोकेश जोडीचा धमाका आणि विराटचे पहिल्या इनिंगमधील तेवरसह पुजारा आणि अजिंक्यच्या भात्यातून धावा निघायलाच हव्यात.

loading image
go to top