esakal | इंग्लंडमध्ये अश्विनचा विकेट मिळवण्यासाठीचा संघर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

R Ashwin

इंग्लंडमध्ये अश्विनचा विकेट मिळवण्यासाठीचा संघर्ष

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी आर अश्विन संघर्ष करताना दिसतोय. इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये (County Cricket) सरेकडून प्रतिनिधीत्व करताना अश्विन विकेट मिळवण्यासाठी चांगलाच संघर्ष करताना दिसला. फिरकीपटूने 43 ओव्हरमध्ये केवळ 1 विकेट मिळाली. चार दिवसीय सामन्यात सरे विरुद्ध खेळणाऱ्या समरसेटने सोमवारी दुसऱ्या दिवशी 148.5 षटकात 429 धावा केल्या. सध्याच्या घडीला अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. काउंटीमध्ये त्याने केवळ एका सामन्यात सहभाग घेतलाय. (IND vs ENG R Ashwin Only One Wicket In 43 Overs Surrey County Championship Match)

कसोटी सामन्यात 400 + विकेट घेणाऱ्या अश्विनला काउंटी सामन्यात नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. 99 धावा खर्ट करुन त्याने केवळ एक विकेट घेतली. खेळाच्या पहिल्या दिवशी त्याने टॉम लॅमनबॉय (42) च्या रुपात एकमेव विकेट घेतली. सरेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोणतीही विकेट न गमावता 24 धावा केल्या होत्या.

हेही वाचा: ENG vs PAK : पाकिस्तानी संघ नको तिथं टॉपर; जाणून घ्या रेकॉर्ड

आर अश्विन यजमान इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघ सुट्टीवर आहे. 4 ऑगस्टपासून भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याला सुरुवात करणार आहे. या मालिकेपूर्वी काउंटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारी आहे.

हेही वाचा: ICC ट्रॉफी सोडा IPL ही जिंकली नाही; विराट नेतृत्वावर रैनाचे बोल

इंग्लंडमध्ये पाच विकेट घेण्याची प्रतिक्षा

सध्याच्या घडीला अश्विन कसोटीमध्ये दमदार कामगिरी करताना दिसतोय. 79 कसोटी सामन्यात त्याने 25 च्या सरासरीने 413 विकेट घेतल्या आहेत. यात त्याने 30 वेळा 5 आणि 7 वेळा 10 विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. एवढेच नाही तर 28 च्या सरासरीने त्याने 2 हजार 685 धावाही केल्यात. यात 5 शतक आणि 11 अर्धशतकाचा समावेश आहे. इंग्लंडमध्ये मात्र त्याला दमदार आणि लक्षवेधी कामगिरी करण्यात यश आलेले नाही. इंग्लंडमधील 7 सामन्यातील 11 डावात त्याने केवळ 18 विकेट घेतल्या आहेत. एकदाही त्याला 5 विकेट घेता आलेल्या नाहीत. 62 धावा खर्च करुन 4 विकेट ही त्याची इंग्लंडमधील सर्वोच्च खेळी आहे.

loading image