Ind Vs Eng : विराट कोहलीच्या बदलीची झाली घोषणा; पुजाराकडे दुर्लक्ष, 'या' खेळाडूला मिळाली संधी

India vs England Test Series 2024 News :
IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathi
IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathisakal

Rajat Patidar To Replace Virat Kohli :

हैदराबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने मालिका सुरू होण्यापूर्वीच पहिल्या दोन सामन्यांसाठी संघातून आपले नाव मागे घेतले आहे. अशा स्थितीत कोहलीच्या जागी कोणत्या खेळाडूचा संघात समावेश होणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता त्याची घोषणा करण्यात आली आहे. कोहलीच्या जागी भारताचा स्टार खेळाडू रजत पाटीदारला संघात स्थान मिळाले आहे.

IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathi
Ind vs Eng : मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का! खेळाडूला मिळाला नाही भारताचा व्हिसा; कर्णधार संतापला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. अशा परिस्थितीत कोहलीच्या जागी पाटीदारला संघात समावेश केला आहे.

पण आता प्रश्न उपस्थित होत की चेतेश्वर पुजाराला संघात जागा का नाही मिळाली. पुजाराने अलीकडेच रणजीमध्ये 243 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर त्याला संघात स्थान मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र पुन्हा एकदा पुजाराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोहलीच्या जागी पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला.

IND vs ENG Test Series Virat Kohli News in Marathi
Ind vs Eng : खेळपट्टीवर राहुल द्रविडच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ! इंग्लंड संघात पसरली चिंता

रजत पाटीदार अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. पाटीदारने अलीकडेच भारत अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात एक अप्रतिम खेळी खेळली. 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात होता, या सामन्यात पाटीदारने 151 धावांची शानदार खेळी केली होती.

विशेष म्हणजे पाटीदारने अवघ्या 158 चेंडूत 151 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 5 षटकारही मारले. आणि तो फॉर्मात असल्याचे स्पष्ट झाले आहे. असो, सध्याच्या भारतीय संघ तरुणांवर डाव खेळला जात आहे, त्यामुळेच पुजाराच्या जागी पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com