India Vs England 1st Test News
India Vs England 1st Test Newssakal

Ind vs Eng : खेळपट्टीवर राहुल द्रविडच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ! इंग्लंड संघात पसरली चिंता

India Vs England 1st Test News :
Published on

India Vs England 1st Test News :

हैदराबाद : पहिल्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी फिरकीस साथ देऊ शकेल, असे संकेत भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिल्यामुळे आपल्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार, याची जाणीव इंग्लंड संघाला झाली आहे.

भारतात कसोटी सामने होत असले, की खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंदू असतो. येत्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी विशेष करून गुड लेंथच्या ठिकाणी दोन्ही एण्डकडून अधिक कोरडी दिसून येत आहे.

India Vs England 1st Test News
IND vs ENG 1st Test: इंग्लंडविरुद्ध यष्टिरक्षक म्हणून भरत-जुरेलमध्ये चुरस; के.एल राहुलचा पत्ता कट

खेळपट्टीचे स्वरूप नेमके कसे असेल, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. खेळ सुरू झाल्यावर नेमकी स्थिती लक्षात येईल, असे मत व्यक्त करण्यास द्रविड यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुरुवात केली आणि कदाचित हलक्या प्रमाणात चेंडू फिरक घेऊ शकेल; पण ही फिरक किती संथ किंवा वेगवान असेल, हे सांगता येणार नाही, असे विधान केले. यावरून खेळपट्टी निश्चितच पहिल्या दिवसापासून फिरकीस साथ देणारी असू शकेल, असा अंदाज इंग्लंड संघाने बांधला.

India Vs England 1st Test News
India vs Syria AFC Asian Cup 2023 : भारतीय फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात! सीरियाकडून १-० असा पराभव

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड यासंदर्भात सावधपणे बोलला, `आम्ही खेळपट्टीबाबत चर्चा केली; परंतु आम्ही ही चर्चा किती गांभीर्याने केली, हे सांगणार नाही. आम्हाला आमच्या क्षमतेवर विश्वास आहे. काही तरी वेगळे दाखवून देण्याची आमचीही तयारी आहे. आमच्याकडेही चांगले फिरकी गोलंदाज आहेत आणि भारतीय फिरकीचा सामना करू शकतील, असे चांगले फलंदाजही आहेत.`

India Vs England 1st Test News
Ind vs Eng 1st Test : केएल राहुलच्या हातातून गेली विकेटकीपिंग, या खेळाडूला मिळणार जबाबदारी; कोच द्रविड स्पष्टच बोलले

या सामन्यासाठी खेळपट्टी तयार करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाज तसेच गोलंदाजांनाही सहाय्य करेल; पण उत्तरोत्तर फिरकी गोलंदाजांना अधिक सहाय्य मिळेल, जे फलंदाज अनुभवी आहेत आणि त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करण्याची क्षमता आहे ते या खेळपट्टीवर धावा करू शकतील, असे हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com