esakal | Wicket please! जड्डूच्या बॉलिंग वेळी 'टाईट फिल्डिंग'
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

Wicket please! जड्डूच्या बॉलिंग वेळी 'टाईट फिल्डिंग'

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India, 4th Test : इंग्लंडविरुद्धच्या चौथा कसोटी सामना जिंकायचा असेल तर टीम इंडियाकडून विकेट कोण घेणार? असा प्रश्न क्रीडा प्रेमींना पडला आहे. इंग्लंडच्या संघाला शार्दूल ठाकूरनं पहिला दणका दिल्यानंतर मलानने आपल्या पायावर स्वत: कुऱ्हाड मारुन घेतली. 5 धावां करुन तो रन आउट झाला. चौथ्या कसोटी सामन्यात अश्विनला बसवून रविंद्र जाडेजावर विश्वास टाकण्यात आला आहे. त्याचीही चर्चा जोरदार रंगताना दिसते. प्रमोशन मिळाल्यानंतरही जाडेजाला बॅटिंगमध्ये फार काही कमाल दाखवता आली नाही.

आता त्याच्यावर गोलंदाजीची जबाबदारी आहे. अश्विनची जागा घेतल्यानंतर तो त्याची उणीव भरुन काढणार का? हे मॅच संपल्यावरच कळेल. मात्र त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक फिल्डिंगची सजावट चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीदने कॅच सोडल्याचेही पाहायला मिळाले. विशेष म्हणजे त्यानंतर जाडेजानेच त्याला तंबूचा रस्ता दाखवत भारतीय संघाची डोकेदुखी बऱ्यापैकी कमी केली.

हेही वाचा: IND vs ENG: भारताच्या गोलंदाजांचा कस; सामना रंगतदार स्थितीत

सामना रंगतदार स्थितीत असताना सोशल मीडियावर जाडेजासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अश्विनला ड्रॉप करुन विराट कोहली आता जड्डूनं सर्व विकेट घ्याव्या अशी अपेक्षा बाळगतोय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहीजण जाडेजाच्या गोलंदाजीचे कौतुकही करत आहेत. एकाने तर अश्विनच्या मुद्यावरुन विनाकारण जाडेजाला ट्रोल केले जात असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: IND vs ENG : ओव्हलवर अश्विन 'अलोन'; फोटो व्हायरल

रविंद्र जाडेजाने 25 पैकी 8 निर्धाव षटके टाकताना केवळ 47 धावा खर्च केल्या. यात तो एक विकेट घेण्यातही यशस्वी ठरला. त्याने घेतलेली विकेट महत्त्वपूर्ण अशी आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर ट्रोल होत असलेल्या जाडेजासाठी त्याचे चाहतेही बॅटिंग करताना दिसत आहे.

loading image
go to top