IND vs ENG: टीम इंडियाचे फायनलचे टिकीट पक्के; अ‍ॅडलेडमधला टॉस अन् बरच काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG Semi Final T20 World Cup toss record adelaide

IND vs ENG: टीम इंडियाचे फायनलचे टिकीट पक्के; अ‍ॅडलेडमधला टॉस अन् बरच काही

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या झिम्बाब्वेच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत संघात खेळत आहे. मात्र, क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे ती म्हणजे अ‍ॅडलेडमधल्या टॉसची. (IND vs ENG Semi Final T20 World Cup toss record adelaide )

अ‍ॅडलेडमधला टॉस आणी टीम इंडिया याच एक समीकरण आहे. या समीकरणामुळं मॅच संपण्यापूर्वीच टीम इंडियाच रिझल्ट लागला आहे. या मैदानावर टॉस हारला तर भारत जिंकतो.

नेमकं काय आहे समीकरण?

सध्याच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये या मैदानावर आतापर्यंत 11 सामने खेळले गेले आहेत. मात्र सामना त्याच संघाचे जिंकला आहे ज्याने नाणेफेक गमावली आहे. भारताने देखील यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील एक सामना अॅडलेडवर खेळला आहे.

भारताचा बांगलादेशविरुद्धचा सामना अ‍ॅडलेडच्या मैदानातच झाला होता. त्या मॅचमध्ये पहिल्यांदा रोहित टॉस हरला आणि भारतानं ती मॅच जिंकली.

आजच्या सामन्यात इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरनं टॉस जिंकला. इंग्लंड यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फेव्हरेट असली तरी टीम इंडियाही तुल्यबळ संघ आहे. पण अ‍ॅडलेड आणि टॉसचं नातं पाहता बटलरसाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते.