विराट सेना भारी म्हणणाऱ्या इंग्लिश दिग्गजाची गावसकरांनी घेतली शाळा

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात मैदानात सामना सुरु असताना मैदानाबाहेर दोन दिग्गजांच्यामध्ये सामना रंगल्याचे पाहायला मिळते आहे.
sunil gavaskar
sunil gavaskar E SAKAL

England vs India : भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी (Sunil Gavaskar) इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन (Nasser Husaain) यांच्या वक्तव्यावर मास्टर स्ट्रोक लगावलाय. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर येणारा भारतीय संघ हा घाबरलेला असायचा. आताची टीम इंडिया त्यापेक्षा वेगळी आहे, असे मत नासिर हुसेन यांनी स्थानिक वृत्तपत्र असलेल्या डेली मेलसाठी लिहिलेल्या लेखात म्हटले होते. त्यानंतर भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात मैदानात सामना सुरु असताना मैदानाबाहेर दोन दिग्गजांच्यामध्ये सामना रंगल्याचे पाहायला मिळते आहे.

सुनील गावसकर यांनी आपल्या जमान्यातील क्रिकेटला उजाळा देत इंग्लंडच्या दिग्गजाला प्रतिउत्तर दिले आहे. आताच्या इंग्लंड टीमच्या तुलनेत कित्येक पटीने भारी असलेल्या इंग्लंड संघाला आम्ही पराभव दाखवला आहे, असे गावसकरांनी म्हटले आहे.

sunil gavaskar
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे 'टीम इंडिया'ची दाणादाण

हेडिंग्ले कसोटीपूर्वी सोनी सिक्सवरील कार्यक्रमात नासिर हुसेन आपल्या मतावर ठाम राहिल्याचे पाहायला मिळाले. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ हा पूर्वीच्या भारतीय संघापेक्षा बेधड कामगिरी करणारा आहे. प्रतिस्पर्धी संघाची त्यांना धास्ती वाटत नाही. सौरव गांगुली यांच्या नेतृत्वापासून टीम इंडियात बदल होत गेला. विराटच्या नेतृत्वाखाली टीम सर्वोच्च स्तरावर पोहचलीये, असे नासिर हुसेन म्हणले.

sunil gavaskar
IND vs ENG: बाबो... असा टॉस उडवलेला कधी पाहिलाय का (Video)

यावर सुनील गावसकरांनी आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. 1971 ते 1987 पर्यंतच्या आपल्या कारकिर्दीतील भारताच्या विदेशी दौऱ्याचा दाखला देत गावसकरांनी हुसेन यांची फिरकी घेतली. 1971 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडला 1-0 आणि 1986 मध्ये 2-0 असा विजय नोंदवला होता, ही गोष्टी विसरु नका. त्यामुळे मागील काळात भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळताना घाबरायचा असे म्हणता येणार नाही, असा टोला गावसकरांनी लागवला. आम्ही इंग्लंडच्या ज्या संघाला पराभूत केले तो संघ आजही सर्वोत्तम आहे, असा उल्लेख करायलाही गावसकर विसरले नाहीत. क्रिकेटच्या पंढरीत भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवली. या सामन्यात भारतीय संघाने 151 धावांनी विजय नोंदवल्यानंतर नासिर हुसेन यांनी टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी भारतीय संघाचे नवे रुप पुर्वीच्या तुलनेत कित्येक पटीने भारी असल्याचे म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com