esakal | बिग बींनी 5 वर्षांपूर्वी उडवली होती खिल्ली; रूटच्या द्विशतकानंतर आता फ्लिंटॉफचा रिप्लाय
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs eng cricket

2016 मध्ये फ्लिंटॉफने विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. तेव्हा फ्लिंटॉफ म्हणाला होता की, विराट जर अशीच फलंदाजी करत राहिला तर तो जो रूट इतका चांगला फलंदाज होईल.

बिग बींनी 5 वर्षांपूर्वी उडवली होती खिल्ली; रूटच्या द्विशतकानंतर आता फ्लिंटॉफचा रिप्लाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - इंग्लंडचा कर्णधार जो रूटने चेन्नईतील कसोटीत 218 धावांची खेळी केली. पहिल्या दिवशी शतक करणाऱ्या रूटने दुसऱ्या दिवशीही जबरदस्त खेळी केली. कसोटी कारकिर्दीत त्याने पाचव्यांदा द्विशतक केलं. जो रूटच्या या खेळीनंतर इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ खूपच आनंदी झाला. त्याने बिग बी अमिताभ बच्चन यांना पाच वर्ष जुन्या ट्विटचं उत्तर दिलं आहे. 

बिग अमिताभ बच्चन यांनी पाच वर्षांपूर्वी जो रूटची खिल्ली उडवली होती. आता त्याने चेन्नईत द्विशतकी खेळी केली. त्यानंतर फ्लिंटॉफने जुनं ट्विट शोधून उत्तर दिलं आहे. अँड्र्यू फ्लिंटॉफने बिग बींच्या ज्या ट्विटला उत्तर दिलं आहे त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं की, जो रूट कोण? मुळातून उखडून टाकू रूटला.

क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

2016 मध्ये फ्लिंटॉफने विराट कोहलीचं कौतुक केलं होतं. तेव्हा फ्लिंटॉफ म्हणाला होता की, विराट जर अशीच फलंदाजी करत राहिला तर तो जो रूट इतका चांगला फलंदाज होईल. मात्र गेल्या पाच वर्षात विराटने जो रूटला बरंच मागे टाकलं. आता रुटने चेन्नई कसोटीत जबरदस्त द्विशतक केल्यानंतर फ्लिंटॉफने बिग बींच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. यात हसल्याचा इमोजी टाकला आहे. 

हे वाचा - स्ट्रेट ड्राइव्ह मारुनही सोशल मीडियावर सचिनची 'विकेट'

चेपॉकवर सुरु असलेल्या कसोटीत रुटने द्विशतक करून अनेक विक्रम केले. जो रूट पहिला असा क्रिकेटपटू ठरला आहे ज्याने 100 व्या कसोटीत द्विशतक साजरं केलं आहे. तसंच त्यानं आतापर्यंत पाच द्विशतकं केली असून याबाबतीत त्याने माजी कर्णधार अॅलिस्टर कूकच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. इंग्लंडकडून सर्वादिक 7 द्विशतकं करण्याचा विक्रम वॅली हेमॉन्डच्या नावावर आहे. जो रूट इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू आहे ज्याने कर्णधार म्हणून तीन द्विशतकं केली आहेत. एवढंच नाही तर जो रूट हा गेल्या 11 वर्षात भारतात पहिल्यांदा द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे.