Video: कॅप्टन कोहलीचं तगडं 'वर्कआऊट'; राशिद खानच्या कमेंटची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Workout

Video: विराटचं तगडं 'वर्कआऊट'; राशिद खानच्या कमेंटची चर्चा

१२ ऑगस्टपासून इंग्लंडविरूद्धची दुसरी कसोटी

Ind vs Eng Test: भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने दुसऱ्या डावात केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे सामन्यात रंगत आली होती. पण पावसामुळे शेवटच्या दिवसाचा खेळ होऊच शकला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ३०३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर इंग्लंडने २०९ धावांचे लक्ष्य भारताला दिले. चौथ्या दिवशी भारताने ५२ धावा करत १ बळी गमावला पण शेवटच्या दिवशी पावसाने सामना होऊ दिला नाही. आता १२ ऑगस्टपासून दुसरी कसोटी सुरू होत असतानाच विराटच्या वर्कआऊटवर राशिद खानने केलेली कमेंट चर्चेत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचा संघ दुसऱ्या कसोटीसाठी लंडनमध्ये दाखल झाले. सामन्याच्या आधी विराटने तगडं वर्कआऊट केलं. वेट्स उचलून आपली शारिरीक तंदुरूस्ती राखण्याच्या दृष्टीने विराटने व्यायाम केला. त्यावेळचा एक व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. पाहा तो व्हिडीओ-

विराटच्या वर्कआऊटबद्दल कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. पण यावेळी विराटच्या वर्कआऊटची भुरळ थेट अफगाणिस्तानच्या फिरकीपटू राशिद खानला पडली. राशिदने विराटच्या व्हिडीओवर तीन इमोजी टाकल्या आणि विराटच्या वर्कआऊटचे कौतुक केले.

Rashid-Khan-Comment

Rashid-Khan-Comment

दरम्यान, पहिल्या डावात विराट पहिल्या चेंडूवर बाद झाला. भारतीय संघाने इंग्लंडला पहिल्या डावात १८३ धावांत गुंडाळले. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीकडून साऱ्यांनाच अपेक्षा होत्या. पण जेम्स अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीवर विराट पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. विराटची अशी अवस्था झाल्यानंतर चाहत्यांनी विराटला तुफान ट्रोल केले.