esakal | Video: भन्नाट स्पिन! चेंडू स्टंपच्या बाहेरून आत वळला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Jadeja-Spin

Video: भन्नाट स्पिन! चेंडू स्टंपच्या बाहेरून आत वळला अन्...

sakal_logo
By
विराज भागवत

जाडेजाने टाकलेला चेंडू हसीब हमीदला कळलाच नाही..

Ind vs Eng 4th Test: भारतीय संघाने यजमानांना ३६८ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना फारसे यश मिळाले नाही. इंग्लंडने पहिल्या सत्रात ५४ धावांची भर घातली. भारताला केवळ दोन बळी घेता आले. पण त्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तब्बल सहा बळी टिपले आणि सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर संघाला नेऊन ठेवले.

हेही वाचा: Wicket please! जड्डूच्या बॉलिंग वेळी 'टाईट फिल्डिंग'

२ बाद १३१ या धावसंख्येवर इंग्लंड दुसरे सत्र खेळण्यास उतरले. कर्णधार जो रूट संयमी खेळ करत होता. पण अर्धशतकवीर हसीब हमीद मात्र चकला. जाडेजाने त्याला ६३ धावांवर त्रिफळाचीत केला. जाडेजाने राऊंड द विकेट गोलंदाजी करताना स्टंपच्या रेषेच्या बाहेर टप्पा टाकला. टप्पा पडल्यावर चेंडू पटकन वळला आणि ऑफ स्टंपला जाऊन आदळला. हसीब हमीदला चेंडू कळलाच नाही. त्यामुळे त्याला माघारी जावे लागले.

हेही वाचा: Video: बुमराहचा खतरनाक यॉर्कर!! 'असा' उडवला बेअरस्टोचा त्रिफळा

त्यानंतर जसप्रीत बुमराहने ओली पोप (२) आणि जॉनी बेअरस्टो (०) दोघांना लगेच त्रिफळा उडवत माघारी धाडले. पाठोपाठ मोईन अलीला शून्यावर जाडेजाने तंबूत पाठवले. जो रूट शांत व संयमी खेळ करत होता. पण बाहेरचा चेंडू मारताना बॅटची कड लागून तोदेखील त्रिफळाचीत झाला. रूटने ३६ धावा केल्या. त्यानंतर उमेश यादवने क्रेग ओव्हरटनला आपल्या जाळ्यात अडकवून झेलबाद केले. त्यामुळे चहापानापर्यंत इंग्लंडची अवस्था ६ बाद १९३ अशी झाली.

loading image
go to top