'छमिया नाच रे' सेहवागची विराट डान्स वर पातळी सोडून कमेंट- VIDEO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli hilarious dance moves during 5th test edgbaston goes viral Virender Sehwag

'छमिया नाच रे' सेहवागची विराट डान्स वर पातळी सोडून कमेंट- VIDEO

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात जोरदार वादाने झाली. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) यांच्यात मैदानावर वाद झाला. पण बेअरस्टोने स्वत:वर नियंत्रण ठेवत शानदार शतक केले. बेअरस्टोच्या शतकानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सेहवागने (Virender Sehwag) कोहलीवर टीका करत ट्विट करून आपले मत मांडले आहे. सेहवागने ट्विटमध्ये लिहिले की, कोहलीच्या स्लेजिंगपूर्वी जॉनी बेअरस्टो 21 च्या स्ट्राइक रेटने खेळत होता आणि नंतर तो 150 च्या खेळायला लागला. पुजारासारखा खेळत होता, पण कोहलीने विनाकारण स्लेजिंग करून बेअरस्टोला पंत बनवल.

हेही वाचा: विराटमुळे जॉनी बेयरस्टो 'पुजाराचां पंत' झाला; सेहवाग ट्विट व्हायरल

पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रविवारी समालोचन करतानाचा वीरेंद्र सेहवागचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सेहवाग मैदानावर फिल्डिंग करताना विराट कोहलीच्या डान्सवर आक्षेपार्ह टिप्पणी करताना ऐकू येत आहे. मोहम्मद कैफ आणि वीरेंद्र सेहवाग ऑन एअर होते. टीम इंडियाची विकेट मिळाल्यावर कोहली डान्स करत आहे. विराट अनेकवेळा चाहत्यांना मनोरंजन करताना दिसतो, मात्र यादरम्यान कॉमेंट्री करणाऱ्या सेहवागने सोशल मीडियावर चाहत्यांना नाराज करणारी एक कॉमेंट पास केली. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी सेहवागला त्याच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सेहवागला कॉमेंट्री टीममधून वगळावे अशीही अनेक जण मागणी करत आहे.

Web Title: Ind Vs Eng Virat Kohli Hilarious Dance Moves During 5th Test Edgbaston Goes Viral Virender Sehwag Reatc Fans Not Happy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..