Video : रोहित-द्रविड नव्या पर्वाची सुरुवात 'युवागीरीनं', व्यंकटेशला संधी | IND vs NZ 1st T02I | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

Video : रोहित-द्रविड नव्या पर्वाची सुरुवात 'युवागीरीनं', व्यंकटेशला संधी

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs New Zealand T20, 1st Match : भारत-न्यूझीलंड यांच्यात जयुपरमधील सवाई मानसिंह क्रिकेट स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium, Jaipur) पहिला टी 20 सामना रंगला आहे. या सामन्यात व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) ला पदार्पणाची संधी मिळाली. व्यंकटेश अय्यरने 20 सप्टेंबर 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. युएईच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत व्यंकटेश अय्यरने 10 सामन्यात 4 अर्धशतकाच्या मदतीने 370 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याने तीन विकेटही घेतल्या होत्या.

रोहित शर्माकडे भारतीय टी20 संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. यासोबतच द्रविडच्या खांद्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी आहे. या जोडगोळीच्या पर्वात कोणत्या युवा खेळाडूला संधी मिळणार याची चर्चा न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वीच रंगण्यास सुरुवात झाली होती. पहिली संधी ही व्यंकटेश अय्यरला देण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने खास ट्विट करत व्यंकटेश अय्यरचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन व्यंकटेश अय्यरचा स्केच शेअर केल आहे. अय्यरच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावरच इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 14 व्या हंगामातील फायनलपर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा: Video: स्विंग मास्टर भुवी! पहिल्याच षटकात मिचेलची दांडी गुल

आठ वर्षांच्या कालावधीनंतर जयपूरच्या मैदानात आंतरराष्ट्रीय सामन्याची मेजवाणी करण्यात आली आहे. या स्टेडियममध्ये 25 हजार प्रेक्षक क्षमता आहे. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच मैदानात प्रेक्षक क्षमतेच्या 100 टक्के लोकांना परवानगी देण्यात आलीये. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात आली आहे.

असा आहे भारतीय संघ

India (Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज.

loading image
go to top