Bhuvneshwar Kumar In Swing |IND vs NZ Video: स्विंग मास्टर भुवी! पहिल्याच षटकात मिचेलची दांडी गुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhuvi-Clean-Bowled-Daryl-Mitchell

कर्णधार रोहितचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Video: स्विंग मास्टर भुवी! पहिल्याच षटकात मिचेलची दांडी गुल

IND vs NZ 1st T20 : न्यूझीलंड विरूद्धच्या टी२० मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने सार्थ ठरवला. भुवनेश्वर कुमारला रोहितला पहिलं षटक टाकण्यासाठी पाचारण केलं. न्यूझीलंडकडून अनुभवी मार्टीन गप्टील आणि टी२० विश्वचषकाच्या सेमीफायनलचा हिरो डॅरेल मिचेल हे दोघे फलंदाजीला आले. पण भुवीने आपल्या स्विंगच्या बळावर मिचेलला खातंही उघडू न देता थेट क्लीन बोल्ड केलं. टप्पा पडल्यानंतर अचानक आत वळलेल्या चेंडूवर मिचेल पूर्णपणे फसला अन् त्याची दांडी गुल झाली.

पाहा भुवनेश्वर कुमारचा इनस्विंगर-

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारतीय संघात युवा क्रिकेटरला संधी देण्यात आली. रोहितच्या नेतृत्वासह द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ जयपूरच्या मैदानात उतरला. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत कोणकोणत्या नव्या खेळाडूंना संधी मिळणार?, हा चर्चेचा विषय होता. यावेळी पहिल्याच सामन्यात IPL स्टार व्यंकटेश अय्यरला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. तसेच, टी२० विश्वचषक स्पर्धेला मुकलेल्या श्रेयस अय्यरला संघात पुनरागमनाची संधी देण्यात आली.

loading image
go to top