
IND vs NZ: ट्रिपल सेंच्युरियन बाहेर! कॅप्टन पांड्याने स्पष्ट सांगितली टीम इंडियाची प्लेइंग-11
India vs New Zealand 1st T20 : भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू दीर्घकाळ संघर्ष करताना दिसतात. दुसरीकडे ज्यांना संधी मिळत आहे ते सर्वजण एकापाठोपाठ एक मोठे डाव खेळून संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे निवड समितीचा ताण वाढला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघातील एका युवा खेळाडूला ही वाईट बातमी सांगितली.
एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियामध्ये दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. ज्यामध्ये इशान किशन आणि शुभमन गिल यांचा समावेश होता. दोन्ही फलंदाजांनी द्विशतक केले आहेत. पण असे काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे प्रतिभा असूनही संधी मिळण्याची आस आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी पृथ्वी शॉचे नाव प्रथम येते. एका वर्षानंतर या खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचे कारण आहे त्याचे त्रिशतक. पण न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच पृथ्वीच्या आशा पल्लवित झाल्या.
पृथ्वीला संधीची वाट पाहावी लागेल – हार्दिक पांड्या
टी-20 संघाच्या कर्णधाराने मालिका सुरू होण्यापूर्वी मीडियाला सांगितले की, 'पृथ्वीला संधीची वाट पाहावी लागेल. कारण गिलने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि तो आधीच टी-20 संघाचा भाग होता.
वृत्तानुसार, गायकवाड दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यानंतर पृथ्वीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र गिल किंवा इशान या दोघांपैकी एकाला विश्रांती दिल्यावरच त्याला खेळण्याची संधी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, कुलदीप यादव.