INDvsNZ 2nd test : अखेर विराटने टॉस जिंकला, फलंदाजीचा निर्णय

निर्णयाक दुसऱ्या कसोटीचे पहिले सत्र वाया गेल्यानंतर अखेर सामन्यास सुरुवात
virat kohli
virat kohliesakal

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या निर्णायक कसोटी सामन्याला ( INDvsNZ 2nd test ) अखेर सुरुवात झाली. वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचे पहिले सत्र पाण्यात गेले. अखेर पंचांनी ११ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेकीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे नाणेफे जिंकण्यात सुमार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने ( virat kohli ) अखेर मालिकेत निर्णायक असलेल्या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकली.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या अनुपस्थितीत झालेल्या पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा मालिकेचा विजेता ठरवणार आहे. . (Ind vs NZ 2nd test Toss Updates)

दरम्यान, भारताने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. कर्णधार विराट कोहली संघात परतला असून जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांनाही दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली आहे. बीसीसीआयने ट्विट केल्या प्रमाणे अजिंक्य रहाणे, ( ajinkya rahane) इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजा ( ravindra jadeja ) हे दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकरणार आहे. (Player injuries in 2nd test)

न्यूझीलंड संघातही मोठा बदल झाला असून कर्णधार केन विलियमसन हा दुखापतीमुळे दुसरी कसोटी खेळणार नाही. त्याच्या ऐवजी संघाचे नेतृत्व टॉम लॅथम ( tom latham ) करणार आहे. विलियमसनच्या जागी संघात डॅरेल मिशेलला संधी मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com