पांड्या - द्रविडने गुपचूप घेतला निर्णय; तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी संघात होणार बदल? | IND vs NZ 3rd T20 Playing 11 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ 3rd T20 Playing 11

IND vs NZ 3rd T20 Playing 11 : पांड्या - द्रविडने गुपचूप घेतला निर्णय; तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी संघात होणार बदल?

IND vs NZ 3rd T20 Playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी भारतीय संघात कोणते बदल होण्याची शक्यता आहे याबाबत चर्चा सुरू असतानाच हार्दिक पांड्या आणि राहुल द्रविडच्या नेतृत्वातील संघ व्यवस्थापनाने गुपचूप एक निर्णय घेतला. भारतीय संघात निवड झालेला पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संघातून रिलीज केले आहे.

मुकेश कुमार हा आता रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल फेरीसाठी बंगालचे प्रतिनिधित्व करत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील एक सामना अजून शिल्लक असताना संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला.

यावरून तिसऱ्या टी 20 सामन्यात मुकेशला संधी मिळण्याची आशा आता मावळली आहे. त्याला या मालिकेत एकाही सामन्यात प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायल सामन्यात मुकेशने झारखंडच्या दोन विकेट्स घेतल्या.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल?

- भारताला मायदेशातील सलग 12 वा विक्रमी मालिका विजय साजरा करण्याची संधी आहे.

- भारताला आपल्या फलंदाजीत काही बदल करण्याची गरज आहे. नाही तर त्यांची विजयी घोडदौड खंडीत होऊ शकते.

- दोन्ही सलामीवीर शुबमन गिल आणि इशान किशन धावा करण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळे पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता आहे.

- पृथ्वी शॉला संधी द्यायची तर शुभमन गिलला बाहेर बसवावे लागले.

- तसं इशान किशन देखील वगळला जाऊ शकतो. मात्र भारताला विकेटकिपर शोधावा लागले. अशा परिस्थितीत जितेश शर्माला संधी मिळू शकते.

- जर इशान किशनला वगळले तर सूर्यकुमार यादव गिलसोबत सलामीला येण्याची शक्याता आहे.

- संघ कसा असेल हे खेळपट्टीवर देखील अवलंबून असेल.

- खेळपट्टी जर फलंदाजीला पोषक असेल तर एखाद्या फिरकीपटूऐवजी अतिरिक्त फलंदाज खेळवला जाईल.

- नरेंद्र मोदी स्टेडियमचा इतिहास हा फलंदाजीला अवघड खेळपट्टी असा आहे.

- टी 20 सामना हा आयपीएल 2022 ची फायनल ही स्टेडियमवरचा शेवटचा टी 20 सामना होता. त्यावेळी धावा करण्यास दोन्ही संघांना अडचणी आल्या होत्या.

- त्यामुळे भारतीय संघात युझवेंद्र चहलची जागा कायम राहू शकते. जर खेळपट्टी चांगली असेल तर उमरान मलिक चहलच्या ऐवजी संघात येऊ शकतो.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ