IND vs NZ: पृथ्वी शॉवर अन्याय! सलामीवीर फ्लॉप तरी का मिळत नाही संधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ind vs nz 3rd t20 playing 11

IND vs NZ: पृथ्वी शॉवर अन्याय! सलामीवीर फ्लॉप तरी का मिळत नाही संधी?

IND vs NZ 3rd T20 Playing-11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेतील दोन सामने खेळल्या गेले असून एक सामना बाकी आहे. टीम इंडियाची नजर आता अहमदाबाद टी-20 सामन्यात मालिका जिंकण्याकडे आहे. या मालिकेदरम्यान पृथ्वी शॉला संधी दिली गेली नाही असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावांचा पाऊस पाडणाऱ्या पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळत नाही.

भारत-न्यूझीलंड मालिकेत सलामीवीर म्हणून ईशान किशन आणि शुभमन गिल अपयशी राहिले आहेत. याआधीही त्याचे काही डाव निराशाजनक होते, त्यामुळेच पृथ्वी शॉला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शुभमन गिलने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत फक्त पाच सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या 76 धावा आहेत.

शुभमन गिलने गेल्या पाच डावांत केवळ 7, 5, 46, 7, 11 धावा केल्या आहेत. यापूर्वीही त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, परंतु त्याने टीम इंडियासाठी वनडे आणि कसोटीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अलीकडेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले.

दूसरा सलामीवीर ईशान किशन देखील टी-20 फॉरमॅटमध्ये खराब फॉर्मचा सामना करत आहे. आतापर्यंत त्याने भारतासाठी 26 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या फक्त 652 धावा आहेत. अलीकडच्या काळात ईशान किशनची जबाबदारी वाढली आहे, कारण तो आता ओपनिंग करत आहे. पण शेवटच्या काही डावांत त्याची बॅट शांत आहे, ज्यामध्ये 2, 3, 4, 19 धावांच्या खेळी आहेत.

पृथ्वी शॉ किती दिवस वाट पाहणार

एकीकडे खराब फॉर्मशी झुंजणारे शुभमन-ईशान आहेत, तर दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडून टीम इंडियात पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ आपल्या पाळी येण्याची वाट पाहत आहे. पृथ्वी शॉ जवळपास दोन वर्षे टीम इंडियातून बाहेर होता, पण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि भारतीय संघात पुनरागमन केले. अहमदाबाद येथे होणाऱ्या टी-20 सामन्यात पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता आहे.