VIDEO : फिरत्या कॅमेऱ्यानं थांबवला खेळ; वानखेडेवर झाला घोळ!

तिसऱ्या दिवशीच्या चहापानापूर्वी मैदानात स्पायडर कॅमेऱ्याचा खेळ पाहायला मिळाला.
IND vs NZ
IND vs NZTwitter

IND vs NZ: मुंबईतील वानखेडेच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 7 बाद 276 धावा करत पाहुण्या न्यूझीलंड संघासमोर 540 धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावालाही सुरुवातही केलीय. तिसऱ्या दिवशीच्या चहापानापूर्वी मैदानात स्पायडर कॅमेऱ्याचा खेळ पाहायला मिळाला.

अश्विन (Ashwin) याने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात टॉम लॅथमच्या रुपात संघाला पहिले यश मिळवून दिले. पहिली विकेट पडल्यानंतर डॅरेल मिशेल मैदानात उतरला. ज्यावेळी नवा फलंदाज मैदानात उतरला. दरम्यानच्या काळात मैदानावर फिरणारा स्पायडर कॅमेरा (Spider Cam) नॉन स्टायकरच्या खेळाडू जवळ अचानकच थांबल्याचे पाहायला मिळाले.

IND vs NZ
टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर गांगुलींची फटकेबाजी

व्हिडिओ शूट करण्यासाठीच स्पायडर कॅम एका जागी स्थिर झाल्याचे पहिल्यांदा वाटले. पण अधिकवेळ कॅम एकाच जागी असल्यामुळे पंचही हैराण झाले. परिस्थिती लक्षात घेता पंचांनी टी ब्रेकचा इशारा केला आणि खेळाडू मैदानाबाहेर गेले. कॅमेऱ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडला होता. टी ब्रेकच्या वेळात यात दुरुस्ती करण्यात आली आणि सामना पुन्हा सुरु झाला.

भारतीय संघाने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडला अवघ्या 62 धावांत आटोपून टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. न्यूझीलंडला फॉलोऑन न देता भारतीय संघाने पुन्हा बॅटिंग केली. 7 बाद 276 धावांवर डाव घोषीत करत टीम इंडियाने पाहुण्यांसमोर 540 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ गडबडला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला असून भारतीय संघ सामन्यासह मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com